मॅराडोनाच्या प्रेमापोटी असंख्य चाहत्यांच्या इच्छेखातर कोल्हापूरातही उभारणार मॅराडोनाचे स्मारक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्ह्यामधील स्पोर्टस असोसिएशनचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसांनिमित्त सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्युट(साई) व फुटबॉल महासंग्राम तर्फे विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे स्मारक व सॉकर थीम पार्क व ८ ते १४ वर्षाखालील खेळाडूंकरीता व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण केंद्र साकारला जाणार आहे. अशी माहिती साई चे सतीश सुर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जगातील फुटबॉल प्रेमींच्या ह्दयात स्थान असलेला अर्जेटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. फुटबॉल वेड्या कोल्हापूरातही त्याचे असंख्य चाहते आहेत. मॅराडोनाच्या प्रेमापोटी असंख्य चाहत्यांची इच्छेखातर कोल्हापूरातही त्याचे पुतळ्याच्या रुपात स्मारक उभे केले जाणार आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. असे सतीश सूर्यवंशी यांनी सांगितले.

कोलकत्ता, गोवा यानंतर तिसरी फुटबॉल पंढरी म्हणून कोल्हापूरकडे पाहीले जाते. त्यामुळे कोल्हापूरचा प्रसार आणि प्रचार व्हावा. या उद्देशाने थीम पार्क उभा केला जाणार आहे. यात जगप्रसिद्ध मेस्सी, नेमार, आदी खेळाडूंचे शिल्प येथे असणार आहेत. विशिष्ट प्रकारचा सेल्फी पॉईट, खेळणी, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, वॉकींग ट्रॅक आदींचा समावेश असणार आहे. फुटबॉल सातासमुद्रापार जावा. याकरीता ८ ते १४ वर्षाखालील मुला-मुलींकरीता प्रोफेशन (व्यावसायिक प्रशिक्षण अकादमी सुरु केली जाणार असल्याचे सांगितले आहे.