पेट्रोलच्या बरोबरीनं झाले डिझेलचे दर, महागाई आणखी भडकणार, ‘या’ क्षेत्रावर होणार ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डिझेलची किंमत आता पेट्रोलच्या किमतीच्या जवळपास बरोबर झाली आहे, दोन्हीच्या दरात केवळ काही पैशांचे अंतर आहे. यामुळे महागाई वाढणे आणि अनेक सेक्टरच्या व्यापारावर गंभीर परिणाम होणार आहे. एकुण डिझेलच्या लागोपाठ वाढलेल्या किमतीचा गंभीर परिणाम सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार आहे आणि कोरोना संकट, लॉकडाऊनने त्रस्त झालेल्या लोकांना यापुढे महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.

इंधन कंपन्यांनी मंगळवारी लागोपाठ 17 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले आहेत. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल तब्बल 86.54 रुपये प्रति लीटर झाले आहे. पेट्रोलच्या दरात आज 32 पैशांची वाढ झाली आहे. तर मुंबईत डिझेल आज 77.76 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. डिझेलमध्ये 52 पैशांची वाढ झाली शाहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई           86.54 – 77.76
पुणे              86.33 – 76.38
ठाणे             86.28 – 76.31
अहमदनगर   86.85 – 76.90
औरंगाबाद     87.09 – 77.12
धुळे              86.80 – 76.85
कोल्हापूर      86.96 – 77.02
नाशिक         86.90 – 76.94
रायगड          86.12 – 76.16

काय होणार परिणाम

डिझेलच्या किमती वाढण्याचा परिणाम चौफेर होत असतो. यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च वाढेल आणि महागाई वाढेल. यामुळे नागरिकांना दुहेरी मार सहन करावा लागेल. एकीकडे ट्रान्सपोर्टसाठी जास्त भाडे द्यावे लागेल आणि महाग वस्तू खरेदी कराव्या लागतील. याचा ऑटो सेक्टरच्या विक्रीवर खुप गंभीर परिणाम होणार आहे.

कच्च्या तेला किमती खुप कमी

यावेळी युपीए सरकारचा 2014 पर्यंतचा काळ किंवा मोदी सरकारचा 2018 पर्यंचा काळ याची तुलना करता कच्च्या तेलाचे भाव अर्ध्यापेक्षा कमी आहेत. 2018 मध्ये कच्चे तेल 80 डॉलर प्रति बॅरलच्या वर होते. भारतीय बॉस्केटसाठी कच्च्या तेलाचा खर्च यावर्षी जानेवारीच्या 70 बॅरल प्रति डॉलरवरून एप्रिलमध्ये 17 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचला. परंतु, सरकारने लागोपाठ पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवला. यामुळे डिझेलचे दर आपल्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचले आहेत. सरकार पेट्रोलियम सेक्टरला महसुलासाठी दुभतीगाय समजते. सतत तिला पाजत राहते.

ट्रान्सपोर्ट होणार महाग आणि महागाई भडकणार

डिझेलचे दर वाढल्याने सर्वात आधी ट्रान्सपोर्ट सेक्टरवर परिणाम होणार आहे. ट्रकभाडे आणि ट्रेनचे मालभाडे वाढत जाईल. यामुळे अन्न आणि भाज्यांसह आवश्यक वस्तूंचे दर वाढतील. अशाप्रकारे महागाई भडकरणार आहे.

प्रवास महागणार

डिझेलचे दर वाढल्याने सार्वजनिक वाहतूक साधने सुद्धा महागणार आहेत. बसचे भाडे वाढेल आणि रेल्वे इंजिन डिझेलवर असेल तर तेथील भाडे वाढेल. डिझेल कार असणार्‍यांना प्रवास करणे महागणार आहे. त्यांचे इंधनाचे बजेट वाढणार आहे.

शेतीचा खर्च वाढणार

डिझलच्या वाढलेल्या किमतीचा मार शेतकर्‍यांनाही झेलावा लागणार आहे. देशात मोठ्याप्रमाणात सिंचन, थ्रेसरिंग सारखी शेतीची कामे डिझेल इंजिनने केली जातात. याशिवाय नेहमी वापरले जाणार ट्रॅक्टर सुद्धा डिझेलवर चालतात. यामुळे डिझेलचे दर वाढल्याने या सेक्टरला मोठा धक्का बसणार आहे. शेकर्‍यांचा उत्पादन खर्च अगोदरच जास्त आहे आणि आता हा खर्च आणखी वाढणार आहे.

डिझेल कारच्या विक्रिवर होणार परिणाम

डिझलच्या वाढत्या किमतीमुळे डिझेल कार विक्रिवर खुप गंभीर परिणाम होणार आहे. काही वर्षापूर्वी इंधनाच्या खर्चाच्यादृष्टीने डिझेल कार एक चांगला पर्याय मानला जात होता. यासाठीच भारतीय बाजारात या कार मोठ्याप्रमाणात आणल्या गेल्या. कंपन्यांनी या गाड्यांच्या प्लांटमध्ये शेकडो कोटी रूपये गुंतवले. परंतु, आता डिझेल आणि पेट्रोलच्या किमती बरोबरीने झाल्याने डिझेल कार खरेदी करण्यात खास फायदा राहणार नाही. लोक या कार खरेदी करताना विचार करतील.

वीजेचा खर्च वाढणार

आता कारखाने, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वीजेच्या पर्यायी गरजेसाठी सर्वात मोठा स्त्रोत डिझेलवर चालणारे मोठ-मोठे जनरेटर आहेत. या जनरेटर्समध्ये डिझेलचा खप खुप मोठ्या प्रमाणात होतो. डिझेलच्या किमती वाढल्याने याचा खर्च वाढणार आहे. यामुळे खर्च वाढणार आहे. या खर्चाची वाढ भरून काढण्यासाठी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवतील, त्याचा भुर्दंड नागरिकांना पडणार आहे.