चाकण-शिक्रापूर मार्गावर टॅंकर उलटला, पेट्रोल-डिझेलची ‘यथेच्छ’ लूट

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन – चाकण शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगावळ पेट्रोल-डिझेल वाहतुक करणारा टॅंकरला अपघात झाला आहे. टॅंकर दोन तीन पलटी खात उलटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती होत आहे. मात्र नागरिकांनी मात्र यथेच्छ इंधन पळविल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालक व अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पेट्रोल डिझेलची वाहतुक करणारा टॅंकर उलटल्याची घटना चाकण शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगाव येथे उलटला. टॅंकर दोन तीन पलटी खाऊन रस्त्यालगत उलटला. त्यानंतर त्यातून इंधनाची गळती सुरु झाली. परंतु सुदैवाने या घटनेत काही दुर्दैवी घटना समोर आली नाही.

चालक आणि दोन इतर लोक जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टॅंकर पुन्हा उभा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय

नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही 

नाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या