औषध फवारणी नंतर वाढदिवासाचे जेवण बेतले जीवावर 

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन 
पुण्यातील सिहंगड येथे  राहणाऱ्या एका कुटुंबाने घरात औषध फवारणी केल्यानंतर वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर जेवनाची पार्टी केली.फवारलेल्या औषधामुळे जेवणानंतर कुटुंबाला उलट्या व जुलाबाचा त्रास झाला त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान 9 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घट्ना उघडकीस आली आहे.

मुस्लीम युवकाशी मैत्री केल्याने पोलिसांची तरूणीला मारहाण

[amazon_link asins=’B078RLDT38′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61f539c4-c152-11e8-8e3b-b31391ce697d’]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संदीप डोंगरे त्यांची पत्नीआणि दोन मुले सार्थक(९) आणि साहिल यांच्यासह सिहंगड येथील आनंदनगर भागात  राहतात. डोंगरे यांच्या दोन मुलांपैकी सार्थक याचा सोमवारी वाढदिवस होता. याआधी डोंगरे कुटुंबाने घरात औषध फवारनी केली होती. वाढदिवस झाल्यांनतर या कुटुंबाने एकत्रित जेवण केले. मात्र जेवणानंतर सर्व कुटुंबालाच अचानक जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे जवळ राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात केले. त्यांच्यावर उपचार सुरु होते . मात्र ९ वर्षाच्या सार्थकचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर संदिप डोंगरे, त्यांच्या पत्नी, व मोठा मुलगा साहिल यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सिहगड रोड पोलीस करत आहेत