गोड पदार्थ खाताना घ्या ‘ही’ काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डायबिटीज असेल तर गोड पदार्थांचा आस्वाद घेता येत नाही. मात्र, सणासुदीच्या काळात डाएटमध्ये काही बदल केल्यास गोड पदार्थांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात सेवन करता येऊ शकते. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. एखादा गोड पदार्थ खाल्ला तर डाएटमधून तेवढ्याच कॅलरीचे पदार्थ किंवा इतर काब्र्स असणारे पदार्थ काढून टाकावेत.

डायबिटीजचे रूग्ण एखाद्या सणाच्या दिवशी गोड पदार्थ खाऊ शकतात. फक्त त्यांना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या मिठायांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्सचा वापर करण्यात आला असेल त्यांचाच आहारामध्ये समावेश करा. बाजारात मिळणाऱ्या शुगर फ्री मिठायांवर अजिबात विश्वास ठेवू नये. खरं तर याऐवजी घरीच तयार केलेल्या गोड पदार्थांना प्राधान्य दिलं पाहिजे.
डायबिटीज रूग्णांनी खाण्यासोबतच पेय पदार्थांबाबतही काळजी घेणं गरजेचं असतं.

डायबिटीजचे रूग्ण सामान्य लोकांप्रमाणे गोड पेय पदार्थ पिऊ शकत नाहीत. डायबिटीज रूग्णांना सण एन्जॉय करण्यासोबतच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं असतं.