Diet for Jaundice and Anemia | काविळ आणि रक्ताच्या कमतरता कमी करण्यासाठी ‘या’ 15 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diet for Jaundice and Anemia | चुकीचे खाणे-पिणे आणि जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. असेच दोन आजार आहेत रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आणि काविळ. (Diet for Jaundice and Anemia) यापासून सुटका होण्यासाठी चांगला आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी कोणते उपाय आहेत व कोणता आहार घ्यावा ते जाणून घेवूयात…

काविळीवर घरगुती उपाय आणि आहार
एक ग्लास पाण्यात थोडे धने रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी प्या. रोज असे केल्याने काविळ बरी होऊ शकते.

गाजर तसेच कोबीचा रस काढून दोन्ही समान मात्रेत प्यायल्याने काविळ बरी होते.

लिंबाची पाने धुवून रस काढा, रोज एक चमचा प्या.

ऊसाच्या रसाचे रोज सेवन करा, सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.

एक कप पाण्यात एक चमचा त्रिफळा रात्री भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्यापोटी प्या. 2 आठवडे सेवन करा.

 

रक्ताची कमतरता असेल तर काय खावे

पालक
पालक नॉन-हीम आयर्न आहे. परंतु यात व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असल्याने आयर्नचे शोषण वाढवते.

कलेजी
लिव्हर म्हणजे कलेजी भरपूर आयर्न असते. याचे सेवन करावे.

शेंगा
शेंगा, डाळ, चने, मटर आणि सोयाबीनचे सेवन करा, यामध्ये आयर्न भरपूर असते.

लाल मांस
लाल मांसमध्ये भरपूर आयर्न असते, त्याचे सेवन करावे.

भोपळ्याचे बी
भोपळ्याच्या बीमध्ये भरपूर आयर्न असल्याने याचे सेवन करावे.

क्विनोआ
क्विनोआ एक लोकप्रिय खाद्य आहे जे नाश्त्यात खाल्ले जाते. यात आयर्न भरपूर असते.

ब्रोकोली
एक कप ब्रोकोलीत (156-ग्रॅम) 1 मिलीग्रॅम आयर्न असते, याचे सेवन करा.

टोफू
टोफू एक सोया आधारित खाद्य आहे. यामध्ये आयर्न भरपूर असते.

डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये सुद्धा भरपूर आयर्न असल्याने रक्तवाढीसाठी चांगले आहे.

मासे
ट्यूनासारख्या काही प्रकारच्या माशात आयर्न भरपूर असते. रक्ताची कमतरता यामुळे भरून येते.

Web Title :-  Diet for Jaundice and Anemia | diet for jaundice and anemia include these 10 foods in your diet to get rid iron deficiency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण

Government Job | पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखत; जाणून घ्या सविस्तर

Bad Habits | तुम्हाला आजारी पाडतील या 6 सवयी, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध