Covid-19 diet tips : लठ्ठपणाने पीडित लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो ‘कोरोना’, वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   संशोधकांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, लठ्ठ माणसांना कोरोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो. लठ्ठपणा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करून गंभीर सूज निर्माण करतो. तो व्हायरसच्या विरोधात लढाईत शरीराला कमजोर करतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी)च्या अन्य एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, लठ्ठपणाशी संबंधित स्थिती कोविड-19 च्या प्रभावाला आणखी वाढवू शकते. यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे खुप गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ सेवन करावेत ते जाणून घेवूयात…

1 केळी

आपल्या नाश्त्यात केळी खा. एक मध्यम आकाराच्या केळ्यात शंभरपेक्षा जास्त कॅलरीज असतात, परंतु तुम्हाला दैनिक फायबरची 12 टक्के आवश्यकता असते. फायबर भूख रोखण्यासाठी पोट संथ गतीने रिकामे करण्यास मदत करते.

2 ओट्स

ओट्समध्ये कॅलरी कमी आणि फायबर आणि प्रोटीनची मात्रा जास्त असते. हे दोन पोषक तत्व भूख आणि वजन नियंत्रणास प्रभावित करतात. ओट्स तुम्ही दूध आणि केळ्यासोबत खाऊ शकता.

3 बेरीज

स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि ब्लूबेरी सारख्या फळांमध्ये कॅलरीज खुप कमी असतात. फायबर भरपूर असते. नाश्त्यात याचे सेवन केल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

4 एवोकाडो

एवोकाडो नाश्त्यात सेवन केल्यास वजन लवकर कमी होऊ शकते. यात फायबर आणि ओलिक अ‍ॅसिड दोनही असते. ज्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

5 अंडे

अंड्यात प्रोटीन भरपूर असते. शिवाय व्हिटॅमिन आणि खनिज प्रदान करते. हे वजन कमी करण्यास उपयोगी आहे.