Diet Plan News | ‘ही’ आहे पृथ्वीवरील सर्वात फिट महिला, जाणून घ्या कसे बनवले पोलादी शरीर; पहा पूर्ण डाएट प्लान

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Diet Plan News | टिया क्लेयर टूमी (Tia Clair) पृथ्वीवरील सर्वात फिट महिला (Fittest Woman On Earth) आहे. ’क्रॉसफिट गेम्स’ (Crossfit Games) मध्ये चारवेळा विजेती टिया जर पाचव्यांदा सुद्धा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली तर ती पुरुष वर्गात मॅट फ्रेसरच्या (Matt Fraser) वर्ल्ड रेकॉर्डची (World Record) बरोबरी करेल. टियाने आपले डेली वर्कआऊट रुटीन (Daily Workout Routine) आणि डाएट प्लानबाबत फॅन्सला सांगितले आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलच्या (YouTube Channel) माध्यमातून टियाने आपला पूर्ण डाएट प्लान शेअर केला आहे, जो ती 2021मध्ये आयोजित गेम्सच्या अगोदरपासून घेत आहे.

ब्रेकफास्ट 1- (Breakfast)
टिया (Tia Clair) ट्रेनिंगच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता उठते. सर्वप्रथम ती थोडे पाणी पिते आणि नंतर दिवसाच्या पहिल्या ब्रेकफास्टकडे निघते. पहिल्या नाश्त्यात टिया एक कप (128 ग्रॅम) ओट्मील, ब्लूबेरी (40 ग्रॅम), एक केळे आणि एक चमचा मध घेते. या ब्रेसफास्टमधून टियाच्या शरीराला 455 कॅलरी मिळते.

File photo

ब्रेकफास्ट 2-
सकाळचे कार्डियो सेशन संपल्यानंतर टिया आपला दूसरा ब्रेकफास्ट करते. गव्हाच्या पीठाचा बेगल (एक प्रकारचा ब्रेड) गोड आणि नमकीन टॉपिंगसह खाते. तिच्या नाश्त्यात एवोकाडो, उकडलेले अंडे, पीनट बटर आणि ब्लॅकबेरी जॅमसुद्धा असते. यातून तिला 640 कॅलरी मिळतात.

File photo

लंचच्या पूर्वी –
दुपारी लंचपूर्वी टिया पाण्यात बनवलेला वीगन प्रोटीन शेक पिते, जो तिच्या मांसपेशींसाठी खुप आवश्यक आहे. तसेच ती प्रोटीनसाठी ’स्मूदीज’चे सेवन करते. याचे प्रमाण तिच्या भूकेवर अवलंबून आहे. यामुळे एक्स्ट्रा एनर्जी मिळते.

File photo

लंच
लंचमध्ये सुद्धा टिया काही महित्वाच्या पदार्थांचाच समावेश करते. दुपरच्या जेवणात ती राजमा, शेंगाची भाजी, गाजर आणि बासमती तांदळाच्या भातासोबत थोडीशी चिंचसुद्धा खाते. टिया म्हणते, हे पदार्थ तिच्या शरीराला सुमारे 950 कॅलरी देतात आणि यातून खुप एनर्जी मिळते.

File photo

 

डिनर –

टियाच्या डिनर थाळीत प्रोटीनचे अनेक वेगवेगळे स्त्रोत दिसतात.
डिनरमध्ये ती रेड मीट खाते किंवा व्हाइट मीट जसे की साल्मन फिश.
हे ती भात आणि हिरव्या भाज्यांसोबत सेवन करते.
टिया म्हणते की तिच्या डिनरमध्ये प्रोटीन युक्त पदार्थ जास्त असतात,
तर दिवसाची थाळी कार्बोहायड्रेटयुक्त असते.

 

डिनरमध्ये ती सुमारे 598 कॅलरी घेते.
टिया ट्रेनिंगच्या दिवशी रोज सुमारे 2900 कॅलरीजचे सेवन करते.
यामध्ये तिचे जेवण, स्नॅक्स आणि सप्लीमेंट्सचा समावेश आहे.
हे सर्व पदार्थ खाल्ल्यानेच तिच्या शरीराला दमदार ट्रेनिंग करण्याची ताकद मिळते.

टियाने जबरदस्त ट्रेनिंगने आपले शरीरा पिळदार केले आहे.
तिचे बायसेप्स, अ‍ॅब्ज, शोल्डर, बॅक आणि फोरआर्म्स पाहून तिच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो.
या 27 जुलैपासून सुरू होत असलेले क्रॉसफिट गेम्स 1 ऑगस्टपर्यंत चालेल.

 

Web Title : Diet Plan News | fittest woman on earth tia clair toomey reveals her diet plan
before crossfit games 2021

Accident in Toranmal | नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Red Light | ‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा’ ! राजेश्वरी खरातचा नवा अंदाज, ‘रेड लाईट’चं पोस्टर रिलीझ (व्हिडीओ)

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान, आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या