Diet tips : नाश्त्यात खाऊ नका ‘या’ 10 वस्तू, ‘इम्यून पॉवर’ होईल कमजोर, शरीराला जडतील आजार

पोलिसनामा ऑनलाईन – सकाळचा नाश्ता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खुप आवश्यक आहे, म्हणून याचे महत्व खास आहे. यामुळे दिवसभर उर्जा मिळते. तज्ज्ञांनुसार, चांगल्या खाण्यापिण्यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते आणि आरोग्य चांगले राहते. अशाच काही वस्तूंबाबत आपण जाणून घेणार आहोत ज्या सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ नयेत.

आंबट फळे
संत्रे आणि टोमॅटोसारख्या आंबट फळात व्हिटॅमिन सी भरपूर असते पण त्यांच्या सेवनाने पोटात अ‍ॅसिड वाढू लागते. सकाळी-सकाळी ही फळे खाल्ल्यास जळजळ, सूज आणि गॅस्ट्रिक समस्या होऊ शकतात.

रिकाम्या पोटी चहा
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात अम्लीय रसाचे उत्पादन वाढते, ज्यामुळे गॅस्ट्रायटिसची समस्या होऊ शकते.

पॅकेट ज्यूस
सकाळी ताज्या फळांचा ज्यूस प्या, पण डबाबंद ज्यूस हानीकारक ठरू शकतो. यामध्ये साखर भरपूर असते. यामुळे अग्नाशयावर वाईटपरिणाम होतो, डायबिटीजचा धोका वाढतो.

केळे
सकाळी केळे खाऊ नये. यामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्याने रिकाम्या पोटी सेवन केल्यास रक्तात दोन्ही खनिजांचे असंतुलन निर्माण होते.

दही
दही आतड्यांसाठी चांगले अन्न आहे. जे योग्य वेळी सेवन केल्यास पचनशक्ती वाढवते. दह्यामध्ये आढळणारे लॅक्टिक अ‍ॅसिड बॅक्टेरिया उच्च अम्लीय सामग्रीमुळे सकाळी सेवन केल्यास अप्रभावी होते. दही दुपारी खावे.

ब्रेड आणि जॅम
ब्रेड आणि जॅम दोन्हीमध्ये फॅट आणि शुगरची मात्रा भरपूर असते. या दोन्ही परिणाम रक्तावर चांगला होत नाही. ब्रेडसोबत अंडे खाणे चांगले ठरू शकते, परंतु जॅम आरोग्यासाठी चांगले नाही.

कच्च्या भाज्या
जेवणात सलाडचा समावेश चांगला आहे, पण सकाळच्या नाश्त्यामध्ये ते खाऊ नये. यामध्ये फायबर भरपूर असल्याने सकाळी पचण्यास जड जाते. यामुळे गॅस, सूज आणि पोटदुखी होऊ शकते.

मांस
जास्त प्रमाणात मांस खाणे कधीही वाईट. तसेच सकाळच्या वेळी तर अजिबात याचे सेवन करू नये. मांसात नायट्रेट असते आणि जास्त खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या आणि कॅन्सरसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.

ज्यूस आणि शेक
फ्रूट ज्यूस आरोग्यासाठी चांगला आहे, परंतु सकाळी ज्यूस पिणे योग्य नाही. ज्यूसमध्ये अनेक प्रकारची अ‍ॅसिड असतात, जी रिकाम्यापोटी शरीराच्या आतील अवयवांचे नुकसान करतात. गोड फळांचे ज्यूस सुद्धा आरोग्यासाठी चांगले नसतात.