Diet tips : रात्री ‘या’ 7 गोष्टी ‘सेवन’ अन् ‘प्राशन’ टाळा, इम्युनिटी होईल मजबूत ! लाभेल दीर्घायुष्य, तणाव कमी हाेऊन बद्धी होईल ‘तल्लख’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना संकटात हेल्दी आणि फिट राहणे जरुरी आहे. हा आजार कमजोर लोकांना लवकर टार्गेट करत आहे. हेल्दी राहण्यासाठी चांगले खाणेपिणे आणि चांगली झोप जरुरी आहे. झोप पूर्ण झाली नाही तरी इम्युन सिस्टिम कमजोर होऊ शकते. आपण काही अशा वस्तूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांचे सेवन रात्री टाळले पाहिजे, जर चांगली झोप हवी असेल.

या वस्त रात्री खाणे टाळा

1 क्रूसीफेरस व्हेजिटेबल

ब्रोकली, फ्लॉवर, आणि कोबीसारख्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे आरोग्यासाठी जरुरी आहे. परंतु रात्री झोपताना पचनक्रियेसाठी पचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यामुळे झोप प्रभावित होते.

2 गोड पदार्थ किंवा आईस्क्रीम

गोड पदार्थ आणि आईस्क्रीम पचन होण्यास बराच वेळ लागतो. शिवाय शरीरात एनर्जी वाढते, त्यामुळे झाेप लवकर लागत नाही.

3 दारू

दारू प्यायल्याने चांगली झोप मिळत नाही, सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. शिवाय इतरही आजार होतात.

4 चहा किंवा कॉफी

चहा, कॉफी किंवा चॉकलेट यामध्ये कॅफीन जास्त असल्यान झोप कमी मिळू शकते.

5 टोमॅटो, आंबट फळे

टोमॅटोमध्ये टायरामाइन नावाचे अमीनो अ‍ॅसिड असल्याने लवकर झोप येत नाही, तर आंबट फळे लवकर डायजेस्ट होत नाहीत, याचा झोपेवर परिणाम होतो.

6 संत्र्याचा ज्यूस

या ज्यूसचे रात्री लवकर पचन होत नाही आणि शरीरात अ‍ॅसिड तयार होते.

7 फास्ट फूड

बर्गर असे फास्ट फूड आहे, जे रात्री खाल्ल्याने थेट पचनशक्तीवर अटॅक करते. हे रात्री पचवणे अवघड असते. यामुळे पोट खराब होऊन झोपेवर परिणाम होतो.