Diet Tips : ‘कोरोना’ काळात खाण्याशी संबंधित करू नका ‘ही’ एक चूक, अन्यथा हळूहळू शरीर होईल आजारांचा ‘अड्डा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकट अद्याप संपलेले नाही. चीनमधून बाहेर पडलेला हा धोकादायक विषाणू अशा लोकांना जास्त प्रभावित करतो ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. यामुळेच तज्ञ कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा आग्रह करीत असतात. त्यामध्ये आहाराची सर्वात महत्वाची भूमिका असते. चांगला आहार केवळ निरोगी राहण्यासाठीच नव्हे तर दीर्घ काळ आयुष्य जगण्यास देखील मदत करतो. आजकाल बरेच लोक खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करत आहेत, ज्या हळूहळू त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे जेवण बनवून त्यास बर्‍याच वेळानंतर खाणे.

रूम टेम्परेचर मध्ये ठेवलेले अन्न लवकर खराब होते

संशोधकांचा असा विश्वास आहे की शिजवलेले ताजे अन्न हे रूम टेम्परेचर मध्ये एका मर्यादेनंतर खराब होते. अमेरिकी संस्था फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) यांनी रूम टेम्परेचरमध्ये बनवून ठेवलेले अन्न खाल्ल्याने होणाऱ्या नुकसानीबाबत आणि किती वेळात ते खराब होते यावर संशोधन केले आहे. संशोधन करत असणाऱ्या संशोधकांनी या विषयात ‘2 तासाची’ एक पॉलिसी तयार केली आहे.

संशोधकांचा असा दावा आहे की 2 तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेले अन्न विषारी होते

या पॉलिसीनुसार आपण किती रूम टेम्परेचर मध्ये अन्न ठेवलेले आहे, याच्या आधारावर दोन तासांत ते अन्न किती प्रमाणात खराब होऊ शकते हे समजू शकते. उदाहरणार्थ, संशोधकांनी असे सांगितले की जर रूम टेम्परेचर 32 डिग्री सेल्सियस असेल तर हे अन्न 2 तासात खराब होईल त्यामुळे असे अन्न खाऊ नये. जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सियस असेल तर हे अन्न एका तासाच्या आत खराब होते. परंतु कमी तापमानात अन्न जास्त काळ टिकू शकते. संशोधनात असेही सांगितले गेले आहे की अन्नामध्ये किती वेळाने बॅक्टेरिया जमा होऊ शकतात.

अन्नामध्ये बॅक्टेरिया किती वेळात जमा होतात ?

जर रूम टेम्परेचर 40 ते 60 डिग्री सेल्सिअस दरम्यान असेल तर 20 मिनिटांच्या आत अन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात आणि अचानक त्यांची संख्या 20 मिनिटांनंतर दुप्पट होते. या अन्नावर जमा झालेल्या एकाच बॅक्टेरियामुळे आणखी लाखो बॅक्टेरिया तयार होतात, ज्यामुळे हे अन्न खाण्यालायक राहत नाही. दरम्यान संशोधकांनी अहवालात असे लिहिले आहे की जर आपण घरी पार्टी आयोजित केली असेल आणि या कालावधीत आपण रूममध्ये बऱ्याच वेळापासून अन्न ठेवले असेल तर आपण अशी भांडी वापरावी ज्यांमध्ये अन्न जास्त वेळेपर्यंत गरम राहील.

अन्न गरम केल्यामुळे बॅक्टेरिया नाश पावतात का ?

आपण एखाद्याकडून हे ऐकलेही असेल की जर रात्री उशिरा अन्न बाहेर पडून असेल तर ते गरम करून खाण्यायोग्य केले जाऊ शकते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. संशोधकांच्या मते, स्टेफिलोकोकस (staphylococcus) आणि बॅसिलस सेरियस (bacillus cereus) नावाचे दोन धोकादायक बॅक्टेरिया देखील बराच काळ बाहेर राहिलेल्या अन्नामध्ये असतात. हे अन्न अधिक गरम केल्यानेही मरत नाहीत.

या प्रकारच्या अन्नावर जलद गतीने जमा होतात बॅक्टेरिया

जर आपण बॅक्टेरियायुक्त अन्न खाल्ले तर अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो. मांस, मासे, अंडी, कोशिंबिर, पेस्ट्री, दूध, दही, पनीर असे पदार्थ जर बाहेरच राहिले तर वेळेत यांना फ्रीजरमध्ये ठेवले नाही तर यांच्यावर बॅक्टेरिया वेगाने जमा होतात. असे असूनही जर ते दुसऱ्यांदा गरम करून किंवा रेफ्रिजरेट करून खाल्ले तर त्यामुळे ताप, अतिसार, डिहायड्रेशन, मळमळ होऊ शकते. म्हणून चुकूनही असे अन्न खाऊ नका.