Diet tips : ‘कोरोना’च्या संकटात जर शरीर ठेवायचे असेल मजबूत तर करा ‘या’ 7 गोष्टींचे सेवन, नंतर पहा कमाल

पोलिसनामा ऑनलाइन – निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी योग्य आहार खुप आवश्यक असतो. बिघडत चाललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, यामुळे सध्या अनेक लोकांमध्ये कमजोरी, रक्ताची कमतरता, थकवा इत्यादी समस्या आढळतात. जर तुम्हाला या समस्या दूर करायच्या असतील आणि शरीर मजबूत ठेवायचे असेल तर काही वस्तूंचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. या वस्तू कोणत्या ते जाणून घेवूयात…

या वस्तूंचे करा सेवन

1 देशी तूप
देशी तूपात प्रोटीन, मिनरल्स तसेच कार्बोहायड्रेट सारखी पोषकतत्व असतात, ज्यामुळे शरीर मजबूत होते.

2 अंडे
नाश्त्यात एक अंडे जरूर खा. दिवसभर प्रोटीन्स आणि मिनरल्सने शरीर भरलेले राहाते.

3 पनीर
जे लोक अंडे सेवन करत नाही त्यांनी पनीर सेवन करावे. यासाठी सकाळी रिकाम्यापोटी 50 ग्रॅम पनीरचा तुकडा खा.

4 रवा
नाश्त्यात रोज रवा सेवन करा. यातील फायबर भरपूर असल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि शरीर मजबूत होते. रक्ताची कमतरता दूर होते. डायबिटीज रूग्णांसाठी सुद्धा हे लाभदायक आहे.

5 मनुका
दूध आणि मनुक्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. शरीर मजबूत होते, रक्ताची कमतरता दूर होते.

6 मखाने
मखाने सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त बनते. हृदय निरोगी ठेवण्यासह हाडे आणि मासपेशी मजबूत होतात.

7 कंटोळी
कंटोळीमध्ये कॅलरी खुप कमी असते. फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, आयर्न आणि अँटीऑक्सीडेंट सारखी पोषकतत्व असल्याने शरीर मजबूत होते. हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. कँसरचा धोका कमी होतो. अनेक रोग दूर राहातात.