Diet Tips : कोरोना, प्रदूषण, थंडी, फुफ्फुस, श्वासरोग टाळण्यासाठी हे जरूरी 3 प्रकारचे व्हिटॅमिन,’या’ 10 गोष्टींचं सेवन करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या लोक कोरोना व्हायरस, थंडी आणि प्रदुषणाचा सामना करत आहेत. अशा स्थितीत श्वास आणि फुफ्फुसाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. थंडीत इम्यूनिटी सिस्टम कमजोर झाल्याने अनेक रोगांचा धोका असतो. हे हवामान अस्थमा आणि श्वास रोग्यांसाठी सुद्धा धोकादायक असते. या समस्यांना दूर ठेवण्यासाठी अनेक व्हिटॅमिन आणि काही महत्वाच्या वस्तूंची गरज असते. याविषयी महत्वाची माहिती जाणून घेवूयात…

1 व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन-ए फुफ्फुसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषकतत्व आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पेशी चांगल्या होतात. याच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या होतात. डेयरी उत्पादने, मासे, धान्य, गाजर, ब्रोकोलीतून व्हिटॅमिन ए मिळते.

2 व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी फुफ्फुसांच्या जुन्या आजारांपासून बचाव करते. इम्यून सिस्टम वाढवते. हाडे मजबूत होतात. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे पोषकतत्व मिळवण्यासाठी आंबट फळे, सिमला मिरची, पेरू, कीवी, ब्रोकोली, केळे आणि जांभूळचे सेवन करा.

3 व्हिटॅमिन डी

दात आणि हाडांच्या मजबूती, श्वास संसर्ग, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) ची जोखीम कमी करते. याच्या कमतरतेमुळे जीव घाबरणे, ब्रोंकायटिस, अस्थमा आणि इतर श्वसन समस्या वाढतात. हे तत्व मिळवण्याचे सूर्यप्रकाश हा प्रमुख स्त्रोत आहे. ट्यूना, सॅमन, सार्डिन, सीप मासे आणि अंडे सेवन करावे.