‘थंडी’पासून बचावासाठी जरूर करा ‘या’ पदार्थांचं नियमित सेवन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – थंडीपासून रक्षण करण्यासाठी गरम कपड्यांसोबत जर आहाराकडे विशेष लक्ष दिले तर शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. तसेच थंडी कमी जाणवते. यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, याची माहिती आपण घेणार आहोत.

असा घ्या आहार

१) थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खावी. यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. यामध्ये इतर धान्यांपेक्षा जास्त प्रोटीन्स असतात.

२) थंडीत आले जास्त वापरा. यामुळे जास्त लाभ होतो. शरीराला उष्णता प्राप्त होते. शिवाय पचन चांगले होते.

३) हिवाळ्यात मधाचा वापरही लाभदायक ठरतो. या दिवसात मध जरूर सेवन करा. यामुळे पचन सुधारते. रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/