Dieting | वजन वाढल्यास ‘इथं’ सरकार करून घेते डाएटिंग, न केल्यास भरावा लागतो दंड

नवी दिल्ली : Dieting | जपान (Japan) जगातील तो देश आहे जिथे सभ्यता आणि संस्कृतीला महत्व आहे. सध्या या देशात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन होत आहे. जपानला आशियातील पहिला विकसित देश होण्याचा मान मिळालेला आहे. जपान सामाजिक आणि तंत्रज्ञान स्तरावर जगातील सर्वात अ‍ॅडव्हान्स देश आहे. याशिवाय हा तो एकमेव देश आहे ज्याने अणू हल्ला सहन केला आहे. अशा सर्वात वेगळ्या जपानबाबत जाणून घेवूयात (Dieting)…

2008 ला केला मेटोबो लॉ

जपानचे सूमो पहेलवान संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तुम्ही जाणून हैराण व्हाल की, सुमो रेसलिंगशिवाय देशात खुप कमी लोक असे आहेत जे ऑबेसिटी किंवा लठ्ठपणाने त्रस्त आहेत. जपानमध्ये लोक खुप संतुलित जेवण घेतात. 2008 च्या मेटोबो लॉ अंतर्गत सरकार 40 ते 75 वर्षापर्यंतच्या लोकांवर नजर ठेवते.

Dieting | why people in japan are not allowed to become fat

कमरेच्या साईजवर लक्ष ठेवते सरकार

लोकांच्या कमरेची साईज वाढणार नाही आणि ते नेहमी फिट राहतील यावर सरकर लक्ष ठेवते. जपानच्या लोकांना या कारणामुळे आपल्या कमरेची साईज घेणे अनिवार्य आहे. दरवर्षी येथे अनेक कंपन्या आणि स्थानिक सरकारांनी जबाबदारी दिली जाते की त्यांनी नागरिकांच्या कमरेची साईज घ्यावी.

काय आहेत सरकारचा ठरलेले स्टँडर्ड

जपानमध्ये पुरुषांसाठी 33.5 इंच आणि महिलांसाठी 35.4 इंचाच्या वेस्टलाईनला मंजूरी सरकारकडून मिळाली आहे. 2005 मध्ये जपानच्या इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनकडून कमरेची ही साईज ठरवण्यात आली होती.

सरकार करते मार्गदर्शन

‘द टाइम्स’नुसार जर साईज यापेक्षा जास्त झाली तर लोकांना तीन महिन्यापर्यंत डाएटिंगसाठी मार्गदर्शन केले जाते, जेणेकरून त्यांचे वजन कमी व्हावे. गरज भासली तर हे 6 महिन्यांसाठी सुद्धा वाढवले जाते.

का जाणवली या कायद्याची गरज

मात्र, हे सुद्धा आहे की लोकांवर यासाठी कारवाई केली जात नाही. कोणताही दंड भरावा लागत नाही. शिक्षा होत नाही मात्र ते ज्या कंपनीत काम करता तिला शिक्षा मिळते. अनेक गंभीर आजारांचा धोका वाढल्याने हा नियम सरकारने केला होता.

कंपन्या आणि स्थानिक सरकारची जबाबदारी

जास्त वजनामुळे आजारी लोकांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने त्या कंपन्या आणि स्थानिक सरकारांना दंड लावला होता जे ठरलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरले होते.

कंपनीला 19 मिलियन डॉलरचा दंड

काही जपानी कंपन्या जसे की पॅनासोनिक वेळोवेळी आपले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय आणि
निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या कमरेचे माप घेते. जपानची पर्सनल कम्प्यूटर्स बनवणारी NEC ला
एकदा वेस्टलाइन कर्मचार्‍यांमुळे 19 मिलियन डॉलरचा दंड भरावा लागला होता.

हे देखील वाचा

Suicide News | खाणावळ चालवणार्‍या दांपत्याची आत्महत्या, दोघांचे मृतदेह आढळले कुजलेला अवस्थेत

Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Dieting | why people in japan are not allowed to become fat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update