Diets To Prevent Liver Disorders | यकृताचे विकार टाळण्यासाठी ‘हे’ पथ्ये पाळणे आवश्यक; जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diets To Prevent Liver Disorders | मेंदूनंतर शरीरातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा अवयव म्हणजे यकृत (Liver) आहे. यकृताचे महत्वाचे कार्य म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता, पचन, चयापचय, अन्नातील शोषलेल्या पोषणद्रव्यांचे संचय आणि विषद्रव्यांचे उत्सर्जन आदी कार्य ते करत असते. खरं तर देशात सध्या यकृताचे विकार (Liver Disorders) वाढताना दिसत आहे. तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मृत्यूमागच्या कारणांपैकी यकृत विकार 10 वे मोठे कारण असल्याचे म्हटले आहे. (Diets to Prevent Liver Disorders)

 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विषाणू संसर्ग, जनुके आणि जीवनशैली सह अतिमद्यपान, अति धूम्रपान, खाण्यातील कुपथ्ये, वाढलेले वजन या कारणामुळे यकृत विकाराचा धोका असतो. यकृताची संपूर्ण हानी होण्याआधी मळमळ, उलटय़ा, ओटीपोटाच्या वरच्या भागामध्ये दुखणे अथवा कावीळ अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे अधिक धोकादायक ठरु शकतो. दरम्यान यकृत चांगले ठेवण्यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक असते. (Diets To Prevent Liver Disorders)

 

1. वजन आटोक्यात ठेवणे (Weight Control) –

स्थूलपणामुळे मद्याविना यकृतवृद्धीचा विकार होतो. त्याला ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (Non-Alcoholic Fatty Liver Disease) म्हणतात. त्यामुळे वजन अटोक्यात ठेवणे महत्वाचे आहे.

 

2. संतुलित आहार घेणे (Eating Balanced Diet) –

अति उष्मांक असलेले भोजन, चरबी, प्रक्रियायुक्त करबेदके (पांढरा ब्रेड, भात, पास्ता), साखरेचे अतिसेवन टाळावे. आहारात तंतू युक्त पदार्थ असावेत. ताजी फळे, भाजीपाला, भाकरी आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

 

3. विषाणू संसर्ग टाळा (Avoid Viral Infections) –

हेपिटाययटिस बी आणि हेपिटायटिस सी या विषाणूचा संसर्ग टाळावा. असुरक्षित लैंगिक संबंध, रक्तसंक्रमण, दुसऱ्याचा टूथब्रश, दाढीचे ब्लेड वगैरे वापरू नयेत. टॅटू वगैरे काढताना पुरेशी स्वच्छता बाळगा. पालक किंवा तुमच्यात हॅपिटायटिस बी किंवा सी संक्रमण झाले असल्यास नियमित तपासणी व उपाय करा. संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस घ्यावी. फवारणीद्वारे मारली जाणारी कीटकनाशके, रसायनांपासून दूर राहा. घरात कीटकनाशके फवारताना मुखपट्टी लावा व दारे-खिडक्या उघड्या ठेवा.

 

4. मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थ टाळा (Avoid Alcohol, Smoking, Drugs) –

मद्यपानामुळे यकृत खराब होते. त्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (Alcoholic Fatty Liver Disease) म्हणतात. मद्यपान टाळावेच. धूम्रपानामुळे धोका वाढतो. वैद्यकीय सल्ल्यांशिवाय घेतली जाणारी वेदनाशामक औषधे, झोपेची औषधे किंवा इतर औषधांचे मिश्रण यकृतासाठी घातक ठरते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Diets To Prevent Liver Disorders | preventive care in chronic liver disease foods to avoid in liver disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा