Coronavirus & Flu : ‘कोरोना’ व्हायरस अन् ‘फ्लू’ मध्ये काय आहे फरक ? ‘हे’ आहेत लक्षणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोनामुळे जग हैराण झाले आहे. फक्त खोकला, शिंक आली तरी लोक एकमेकांकडे पाहत आहे. त्याला कारण देखील तसेच आहे, लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला लोकांना कोरोना आणि फ्लू याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, कारण दोन्हीची लक्षणं जवळपास सारखीच आहेत परंतु या दोन्ही आजारात फरक आहे.

कोरोना व्हायरसची काही सामान्य लक्षणं आहेत जसे की ताप, थकवा आणि कोरडा खोकला. डब्ल्यूएचओनुसार जर एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण अशा समस्या जाणवत असतील तर त्यांनी तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आतापर्यंत 200 लोक भारतात कोरोनाच्या विळख्यात आली आहेत आणि ही संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने घरातून बाहेर पडणं धोक्याचं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे की घरातच थांबावे.

कोरोनाची लक्षण –

1) कोरोना व्हायरसमुळे व्यक्तीला पहिल्यांदा ताप येतो, मग कोरडा खोकला येतो. त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो.

2) व्हायरसची लक्षण तीन दिवसांनी दिसण्यास सुरुवात होते. तर विशेषज्ञांच्या मते ही लक्षण दिसण्यास यापेक्षा जास्त वेळ देखील लागू शकतो.

3) डब्ल्यूएचओनुसार व्हायरसची लक्षणं दिसण्यास 14 दिवस देखील लागतात. त्यापेक्षा जास्त म्हणजे 24 दिवस देखील लागण्याची शक्यता असते.

4) कोविड 19 चे संक्रमण ज्या लोकांमध्ये आढळते त्यांना या व्हायरसचा प्रदुर्भाव लवकर होतो. याशिवाय हा व्हायरस व्यक्तीला आजारी करण्याआधीच पसरु शकतो.

फ्लूची लक्षण –

1) फ्लूमध्ये व्यक्तीला सर्दीसह ताप देखील येतो.

2) त्यानंतर सर्दी आणि ताप वाढतो.

3) तसेच ज्या लोकांना कोरोना झाला आहे त्यातील खूप कमी लोकांना खोकल्यासह नाक वाहण्याची समस्या उद्भवते.

जर तुम्हाला फक्त खोकला येत असेल तर याचा हा अर्थ असा नाही की तुम्हाला कोरोना आहे. सध्या संक्रमित हजारो लोकांवर उपचार सुरु आहेत. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढेल. डब्ल्यूएचओच्या मते भारत, ब्रिटन आणि अमेरिकेसह कोरोना व्हायरस आतापर्यंत 166 देशात पसरला आहे आणि यामुळे हजारो लोकांचा जीव गेला आहे.