जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – त्वचा ड्राय असो वा डिहायड्रेटेड असो हिवाळ्यामध्ये तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. मात्र, ड्राय म्हणजे कोरडी त्वचा असणं आणि डिहायड्रेटेड असणं यात खूप फरक आहे. ब्युटी तज्ञ्जांच्या मते डिहायड्रेटेड त्वचा अगदी कोरड्या त्वचेसारखी दिसते.

ड्राय स्किन
ड्राय म्हणजेच कोरड्या त्वचेवर सुरकुत्या. अशा त्वचेचे पापुद्रे सुटत असतात. त्वचा लवकर लाल होऊन कोरडेपणामुळे त्वचेला खाज येते. काही लोकांची त्वचा जन्मतःच अशा कोरडी असते. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणं, पोषक आणि संतुलित आहार घेणं, त्वचेला मॉईस्चराईझ करणं, हाच यावरील उपाय आहे.

डिहायड्रेटेड स्किन
शरीरात पाण्याचा अंश कमी असतो तेव्हा त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. अशा प्रकारच्या त्वचेला डिहायड्रेटेड त्वचा असे म्हणतात. बर्‍याचदा अशा त्वचेवर प्रमाणात त्वचेमधील तेल जमा होतं. हिवाळा, उत्तेजित पेयांचे अती सेवन, सतत युरिनला होणं, अती व्यायाम, पाणी कमी पिणं अशा अनेक कारणांमुळे त्वचा डिहायड्रेट होऊ शकते. ज्यामुळे त्वचेला खाज येते, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात, डोळे खोलवर जातात, स्किन टोन बदलतो आणि चेहर्‍यावर सुरकुत्या येतात. ड्राय स्किन व डिहायड्रेटेड त्वचा यातील फरक लक्षात आल्यास डिहायड्रेटेड त्वचेवर उपचार करणं सोपं जातं.

अशी घ्या, डिहायड्रेटेड त्वचेची काळजी
ड्राय स्किन हा त्वचेचा एक प्रकार आहे. मात्र, डिहायड्रेटेड त्वचा हा जीवनशैलीमुळे झालेली एक समस्या असल्यामुळे या त्वचेवर वेळीच काही उपाय करावा.

पाणी भरपूर प्यावे
शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यक असते. जेव्हा शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. यासाठी तज्ञ सांगतात, कोणताही ऋतू असला तरी कमीत कमी 8 ग्लास पाणी दिवसभरात प्यायलाच हवं. तुम्ही शरीराची गरज, शारीरिक हालचाल, व्यायामाचे प्रमाण, कामाचे स्वरूप, वातावरण, वजन, वय यानुसार यापेक्षा अधिक प्रमाणात पाणी प्यावे. मात्र, यापेक्षा कमी पाणी पिऊ नये. पुरेसं पाणी पिण्यामुळे त्वचा फ्रेश राहते.

व्यसनांपासून दूर राहावे
त्वचा डिहायड्रेड असेल तर यावर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. त्वचा डिहायड्रेट होण्यामागे अती मद्यपान ही व्यसनं कारणीभूत असू शकतात. यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहावे.

स्लिपिंग मास्क वापरावा
रात्री झोपताना त्वचेला अधिक मॉईस्चराईझरची गरज असते. कारण, या काळात त्वचेला योग्य आराम आणि पोषण मिळत असते. यासाठी रात्री झोपताना चांगले मॉईस्चराईझर, नाईट सीरम अथवा स्लिपिंग मास्क त्वचेवर लावावा. रात्री झोपताना त्वचेला नारळाचं तेल, बदामाचं तेल अशी नैसर्गिक तेल लावूनही मॉईस्चराईझ करता येतं.

हार्श स्क्रब त्वचेवर वापरू नका
त्वचेवर तु्म्ही सतत स्क्रबचा वापर करत असाल तर त्वचा अधिक कोरडी होऊन त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी कोणतेही खरखरीत पदार्थ, हार्श स्क्रब, चेहरा पुसण्यासाठी जाड टॉवेल यांचा वापर करू नये. त्वचा स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक घटक असलेले आणि त्वचेवर सौम्य असतील अशा गोष्टींचा वापर करावा.