ग्रीन टी का लेमन टी ? दिवस सुरू करण्यासाठी काय चांगले आहे ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करायला आवडते. यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जावान आणि उत्साही वाटते. पण दूध आणि साखर याचा चहा पिल्याने शरीराचे नुकसान होते. तसेच वजन वाढल्यास शरीराला इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. बर्‍याच लोकांनी दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी आणि लेमन टी पिण्यास सुरुवात केली. पण कोणता चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टींचे सेवन केल्याने पित्त, चिडचिड आणि पोटासंबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.

१) लेमन टी
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नाॅलॉजी इन्फार्मेशननुसार लेमन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म शरीराच्या आतून साफ करतात. यामुळे वजन, साखरेची पातळी आणि कोलेस्ट्राॅल नियंत्रणात राहते आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. खोकला, सर्दी, ताप आणि इतर हंगामी रोगांपासून बचाव होतो.

२) ग्रीन टी
तज्ज्ञांच्या मते, ग्रीन-टीमध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्याचे सेवन केल्याने हृदय व मन चांगले कार्य करते. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे हंगामी रोग टाळण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणाखाली राहणे, हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांना प्रतिबंधित करते. तसेच औषधी गुणधर्म असलेले ग्रीन टी पिण्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते.

लेमन टी आणि ग्रीन टीमधील फरक
– ग्रीन टी तयार करण्यासाठी खास हर्बल पाने वापरली जातात. पण लेमन टी साधा चहासारखा तयार केला जातो.
– ग्रीन टीवर कमी प्रक्रिया केली जाते, यामुळे हे शरीरास रोगांपासून वाचवते. तसेच हे शरीरातील साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करते, तर लेमन-टी बनविण्यासाठी आले, दालचिनी आणि लवंग हे साहित्य वापरले जाते. यामुळे हे हंगामी रोगांपासून शरीराचे रक्षण करते.

कोणता चहा अधिक फायदेशीर आहे …

लिंबूंमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, हे हंगामी रोगांपासून बचाव करतात. परंतु बर्‍याच वेळा रिकाम्यापोटी लिंबाचे सेवन केल्याने पित्त, पोटदुखी आणि पोटाशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.

ग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सिडंट अ‍ॅंटीथ्रैटिक, जीवाणूरोधी, एंटी-जेनोजेनिक, एंटी-वायरल गुणधर्म असतात, जे वजन कमी करते तसेच मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते. तज्ज्ञांच्या मते, लेमन टीपेक्षा ग्रीन टी शरीरावर अधिक काळ प्रभाव दर्शवते. दररोज १ कप लेमन टी पिण्याच्या तुलनेत ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे.

याशिवाय ज्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर शिंका येत असेल किंवा कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल, तर लेमन टी पिणे फायद्याचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे.

You might also like