सरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या कुणाला मिळणार प्राथमिकता?

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय आरोग्य (Central Health) आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Family Welfare) पुन्हा एकदा कोविशील्डच्या (covishield) पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर कमी केले आहे. दुसर्‍या डोसमधील गॅप दोन वेळा वाढवला गेला, मात्रा आता हा गॅप कमी करण्यात आला आहे. हे केवळ त्यांच्यासाठी आहे जे परदेश प्रवासाला जात आहेत. नवीन गाईडलाईननंतर आता काही श्रेणींसाठी 84 दिवसांची प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही.

आता 28 दिवसानंतर सुद्धा कोविशील्डचा covishield दुसरा डोस घेतला जाऊ शकतो.
मात्र, कोव्हॅक्सीनसाठी दोन डोसमधील अंतर अजूनही 28 दिवसांचेच आहे.
त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कोविशील्डच्या covishield दोन्ही डोसमधील गॅप तिसर्‍यांदा बदलला आहे. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या व्हॅक्सीनेशनमध्ये अगोदर 28 ते 42 दिवसांचे अंतर होते. नंतर 22 मार्चला हा गॅप वाढवून 6-8 आठवड्यांचा करण्यात आला. यानंतर 13 मे रोजी हे अंतर 12-16 आठवडे करण्यात आले.

काय सांगते नवीन गाईडलाईन?
आरोग्य मंत्रालयाची (Ministry of Health) नवीन गाईडलाईन त्यांच्यासाठी आहे, ज्यांना कोविशील्डचा पहिला डोस दिला गेला आहे आणि त्यांना परदेश प्रवासाला (Travel abroad) जायचे आहे. हा परदेश प्रवास शिक्षण, रोजगार आणि ऑलंम्पिक टीमसाठी असू शकतो. अशा लोकांना कोविशील्डच्या दुसर्‍या डोससाठी 84 दिवसांची वाट पहावी लागणार नाही. ते यापूर्वी सुद्धा दुसरा डोस घेऊ शकतात.

Corona Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेण्यात महिला मागे, 1000 पुरुषांमागे 854 ने घेतली लस

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

Wab Title :- difference between the two doses of covishield is reduced by mohfw