पोलीस गणवेश भत्त्यात प्रचंड तफावत, कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील पोलीस दलात उपनिरीक्षकांपासून अप्पर पोलीस अधीक्षकांना आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता दिला जातो. मात्र या मिळणा-या गणवेश भत्यात प्रचंड तफावत असल्याने आणि मिळणाऱ्या कमी भत्त्यामुळे कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा (difference-police-uniform-allowance-displeasure-among-junior-police-officers) सूर दिसून येत आहे.

पोलीस उपनिरीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना 2006 पर्यंत दर 4 वर्षांसाठी 2,500 रुपये गणवेश भत्ता दिला जात होता. 2006 नंतर यात वाढ करून तो 4 वर्षांसाठी 5 हजार केला. म्हणजे प्रतिवर्षी 1,250 रु. इतकी रक्कम देणे सुरू झाले. यात नवीन गणवेश घेणे आणि जुने स्वच्छ धुऊन इस्तरी करून वापरावेत, अशी शासनाची अपेक्षा होती. 2006 पासून यात कोणतीही वाढ केलेली नाही. भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही गणवेश भत्ता मिळावा व त्यास महागाई भत्त्याशी जोडावे, अशी कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अपेक्षा असली तरीही शिस्तीच्या खात्यात त्यांना अशी मागणी करता येत नाही, असे अनेक अधिकारी खाजगीत सांगतात. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात 2015 मध्ये वाढ करून ती दवर्षीसाठी 5 हजार 167 केली आहे.

प्रतिवर्ष मिळणारा गणवेश भत्ता
पोलीस कॉन्स्टेबल ते एएसआय 5,167
पीएसआय ते ॲडिशनल एसपी 1,250
आयपीएस अधिकारी 20 हजार रुपये

पोलीस अधिका-यांना प्रतिवर्ष 20 हजार गणवेश भत्ता
2018 मध्ये भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना गणवेश अनुदानात वाढ दिली आहे. शासनाने 22 फेब्रुवारी 2018 पासून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना प्रतिवर्ष 20 हजार रुपये गणवेश भत्ता देण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय गणवेश भत्त्याची रक्कम महागाई भत्त्याशी जोडली गेली असून महागाई भत्त्याच्या दरात 50 टक्के वाढ झाली की गणवेश भत्त्यात 25 टक्के वाढ आपोआप होणार आहे.