दुधामध्ये देखील असतात वेगवेगळे प्रकार; तुमच्यासाठी कोणतं ‘दूध’ आहे योग्य? जाणून घ्या…

पोलीसनामा ऑनलाईन : दुधाचे महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे दुधाला पूर्णान्न म्हणतात. हाडांना मजबुती मिळावी त्यामुळे सर्वजण दूध पितात. विशेष म्हणजे दुधात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात, त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

गायीचं दूध –

गाईच्या दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात असे जर्नल ऑफ पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी अँड न्यूट्रिशनच्या वर्ष 2017 ला प्रकाशित झालेल्या अभ्यासात सांगण्यात आले होते. याव्यतिरिक्त दुधात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट देखील असतात.

म्हशीचं दूध –

म्हशीचं दूध हे गाईच्या दुधापेक्षा हेल्दी असतं असं लिपिड्स इन हेल्थ अँड डिसीजमध्ये 2017 साली प्रकाशित झालेल्या अभ्यासात समोर आले. म्हशीच्या दुधात अमिनो अ‍ॅसिड, झिंक, सिलेनियम आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. तसेच म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते.

बकरीचं दूध –

बकरीचं दूध हे पचण्यास अतिशय हलकं असतं आणि बकरीच्या दुधात फॅट कमी प्रमाणात असतात शिवाय मोठ्या प्रमाणात पोषक घटक देखील असतात. असे एशियन-ऑस्ट्रेलेशियन जर्नल ऑफ अ‍ॅनिमल सायन्सेजमध्ये साल 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात आढळून आले.

सोया मिल्क –

सोयाबीन्सपासून तयार होणारे सोया मिल्क हे गायीच्या दुधाला उत्तम पर्याय मानलं जातं. सोया मिल्कमध्ये देखील गायीच्या दुधाप्रमाणेच फॅट, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. शिवाय अमिनो अ‍ॅसिड असतं. त्यामुळे पूर्ण प्रोटीन म्हणून हे दूध प्यायलं जातं.

ओट मिल्क –

ओट मिल्कमध्ये गायीच्या दुधापेक्षा प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण कमी तसं कमी असतं. परंतु कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात ओट मिल्क मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतं.

नारळाचं दूध –

नारळाचं दूध हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच ब्लड कोलेस्ट्रॉलची पातळीला देखील हे नियंत्रणात ठेवते. नारळाच्या दुधात पोषक घटक कमी असतात.

बदामाचं दूध –

निरोगी आरोग्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बदामाचं दूध पिणं पसंत करतात. बदामाच्या दुधात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज कमी असतात.