‘युरीनरी रिटेंशन’ म्हणजे काय ? ‘ही’ लक्षणं कराणं अन् उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम

युरीनरी रिटेंशन म्हणजे काय ?

जेव्हा एखाद्याला लघवी करावीशी वाटते आणि मुत्राशय भरल्यासारखं वाटतं परंतु त्याला लघवी करता येत नाही त्याला युरीनरी रिटेंशन म्हणतात. अशात ती व्यक्ती पुरेशी लघवी करू शकत नाही. यात वेदनाही होऊ शकतात. हळूवार मुत्राशय रिकामं होत नाही असं रुग्णाला जाणवत असतं.

काय आहेत याची लक्षणं ?

– लघवी करता येत नाही
– लघवी करावी वाटते
– ओटीपोटात दुखणं
– ओटीपोट फुगल्यासारखं वाटणं

दीर्घकालीन युरीनरी रिटेंशनची लक्षणं

– लघवी करताना त्रास होणं
– लघवीचा प्रवाह कमी होणं
– लघवी केल्यानंतर देखील लघवी करावीशी वाटणे
– लघवी केल्यानंतर पोटात काहीसं दुखणं

काय आहेत याची कारणं ?

– ओटीपोटात किंवा गुप्तांगाजवळ दुखापत
– स्नायूंच्या समस्या
– प्रभावित क्षेत्रावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया
– मधुमेह किंवा मल्टीपल स्क्लेरोसिस सारखे विकार
– कमकुवत मुत्राशय स्नायू
– बद्धकोष्ठता
– काही औषधोपचार
– युरीनरी ट्रॅक इंफेक्शन
– मुत्रमार्गात अडथळा

कसे केले जातात यावर उपचार ?

– युरेथ्रल डायलेशन (लघवी निघण्यासाठी मुत्रमार्गाचं छित्र मोठं करणे)
– युरेथ्रल स्टेंट प्लेसमेंट (मूत्रमार्ग रुंद करण्यासाठी कृत्रिम नळी घालणं)
– प्रोस्ट्रेट औषधं (प्रोस्ट्रेटची वाढ थांबवून युरीनरी रिटेंशनच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी औषधं)
– ब्लॅडर ड्रेनेज (नळी वापरून ब्लॅडर रिकामं करणे)
-शस्त्रक्रिया

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.