DIG निशिकांत मोरे प्रकरण : बेपत्ता झालेली मुलगी सापडली 19 वर्षीय मुलासोबत, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाढदिवसादिवशी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पुण्यातील एमटी विभागातील डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात करून त्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान पीडीत मुलगी राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. पीडित मुलीने डीआयजी निशिकांत मोरे यांना जबाबदार धरून घरातून बेपत्ता झाली होती. या मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. ही मुलगी अखेर सापडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. देहराडूनमधून या मुलीला पोलिसांनीं मुंबईत आणले असून तिला तिच्या एका 19 वर्षीय मित्रासोबत मुंबईत आणण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मुलगी मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथून तब्बल 170 किलोमिटर दूर या तरुणीचा शोध लागला आहे. 6 जानेवारी रोजी पीडित तरुणी घरातून रात्री साडे अकराच्या सुमारास बेपत्ता झाली होती. पीडित मुलगी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनसहून उत्तर प्रदेशात गेली होती. ही तरूणी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून उत्तर प्रदेशात गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. तेव्हापासून पोलीस तरुणीचा शोध घेत होते.

पोलिसांनी या तरुणीचा शोध घेऊन अखेर या तरुणीला मुंबईत घेऊन आले आहेत. तरुणी कौटुंबिक मित्रासोबत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र अद्याप आम्हाला काहीही माहित नसल्याचे सांगितले. नवी मुंबई आयुक्त संजय कुमार यांनी बेपत्ता मुलगी सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिली आहे. नवी मुंबई पोलीस तिला घेऊ येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, बेपत्ता तरुणी कुठे सापडली याबाबत माहिती देण्यास नकार दिला. याप्रकरणी मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.

प्रकरणाला वेगळे वळण
बेपत्ता झालेल्या तरुणीच्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वाहन चालक असलेल्या साळवेकडून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टात धमकावण्यात आल्याचा दावा केला होता. पालकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांनंतर निशिकांत मोरे यांच्या निलंबनानंतर वाहन चालकावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/