‘मपोसे’ अधिकाऱ्यांचे कार्यमुल्यांकन १५ एप्रिलपर्यंत करा

पोलीस महासंचालकांची घटकप्रमुखांना सुचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – महाराष्ट्र पोलीस सेवेतील (मपोसे) पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व उपअधिक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या  मागील आर्थिक वर्षाच्या कामाचा आढावा १५ एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावा अशी सुचना  पोलीस महासंचालकांनी सर्व घटकप्रमुखांना दिली आहे.  त्यांच्या lवार्षिक कार्याचे मुल्यांकन करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

कौशल्यपुर्ण व साहसी कामागिरीसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या पदक, सन्मानचिन्ह दिली जातात. त्यासाठी त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर)व बक्षिसे यांचा महत्वाचा वाटा असतो. मागील वर्षापासून कारकूनापासून सर्वांचेचे गोपनीय अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा नियम राज्य सरकारने केला आहे. मात्र घटकप्रमुखांकडून मपोसे असलेल्या पोलीस उपायुक्त, अप्पर अधिक्षक, सहायक पोलीस आयुक्त, उपअधिक्षक यांच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कामाचे मुल्यांकन अद्याप करण्यात आले नाही. त्यासाठी पोलीस महासंचलाकांनी १५ एप्रिल पर्यंतची मुदत घटक प्रमुखांना दिली आहे.

आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांची कामाच्या अहवालाची पुर्तता करण्याकडे दूर्लक्ष करण्यात आल्याने संबंधितांची वेतनवाढ रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Loading...
You might also like