आयपीएस मनोज लोहिया यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळात सध्या पोलिस उपमहानिरीक्षक म्हणुन कार्यरत असणार्‍या मनोज लोहिया यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्‍नती करण्यात आली असुन त्यांची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (मुंबई) येथे बदली करण्यात आली आहे. लोहिया यांना आहे त्याच विभागात ठेवण्यात आले आहे मात्र त्यांना पदोन्‍नती देण्यात आली आहे.

मनोज लोहिया यांनी मुंबई, पुणे येथे वेगवेगळया पदावर कर्तव्य बजाविले आहे. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लोहिया यांच्याकडे पाहिले जाते. पुणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्‍लिष्ट गुन्हयांचा झडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश मिळाले होते. पुणे ग्रामीण येथून त्यांची मुंबईत बदली झाली. त्यानंतर त्यांना पोलिस उप महानिरीक्षकपदी बढती मिळाली तर आता त्यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.

विशेष महानिरीक्षकपदी पदोन्‍नती मिळालेल्या 5 पोलिस उप महानिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे :-

1. मनोज एस. लोहिया (पोलिस उप महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई – पदोन्‍नतीने)

2. प्रदीप व्ही. देशपांडे (अप्पर पोलिस आयुक्‍त गुन्हे, पुणे शहर ते संचालक, महाराष्ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी, पुणे),

3. प्रताप आर. दिघावकर (पोलिस उप महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, मुंबई – पदोन्‍नतीने)

4. दत्‍तात्रय यादव मंडलिक (पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुन्हे अभिलेख कक्ष, पुणे – पदोन्‍नतीने)

5. केशव जी. पाटील (अप्पर पोलिस आयुक्‍त, प्रशासन, ठाणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण, प्रशिक्षण संचालनालय, मुंबई)