DIG मोरेंचा अटकपूर्व फेटाळला ! पिडीतेच्या वडिलांना धमकावणारा मुख्यमंत्री ठाकरेंचा सरकारी चालक / पोलिस कर्मचारी निलंबीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या विरोधात विनयभंग प्रकरणात आणखी एक तक्रार समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीवर चालक असलेले पोलीस कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी धमकी दिल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी केली आहे. याप्रकरणी दिनकर साळवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, विनयभंगाची तक्रार करणारी मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. तर दुसरीकडे निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चालक असलेल्या दिनकर साळवेंकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी पनवेल कोर्टात धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणात मुख्यमंत्र्यांचे चालक दिनकर साळवेंचा देखील सहभाग असल्याची माहिती उघड झाली आहे. तक्रारदार मुलीच्या पालकांना धमकावल्याचा आरोप दिनकर साळवे यांच्यावर लावण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी पनवेल कोर्टात निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना साळवे यांनी मुलीच्या वडीलांच्या जवळ जात शांत रहनेका, मै उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हूँ अशा शब्दात धमकी दिली होती. साळवे यांनी धमकी दिल्याची तक्रार वडीलांनी केल्यानंतर साळवे यांचे आज निलंबन करण्यात आले. मागील 15 दिवसांपासून साळवे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहेत. तर साळवे आणि मोरे हे मागील 15 वर्षापासून एकमेकांना ओळखत असल्याचा आरोप मुलीच्या वडीलांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/