IPS प्रताप दिघावकर यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी (IG) बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षात सध्या पोलिस उप महानिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या प्रताप दिघावकर यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर इतर चौघा अधिकार्‍यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. सध्या दिघावकर हे महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षात कार्यरत असुन तेथेच त्यांना पदोन्‍नती देण्यात आली आहे.

प्रताप दिघावकर यांनी पुणे, ठाणे आणि मुंबई येथे विविध पदावर कर्तव्य बजाविले आहे. पुणे ग्रामीण येथे पोलिस अधिक्षक म्हणून त्यांनी उत्‍तम कामगिरी केली होती. त्यांच्या काळात अनेक महत्वाच्या गुन्हयांचा तपास केला आहे. इंदापूर येथे बलात्कार प्रकरणाचा छडा देखील लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता. दिघावकर यांनी पुणे पोलिस अधीक्षक पदाचा पदाभार घेतल्यानंतर आठ दिवसाच्या आतच इंदापूर येथील अतिशय गंभीर अशा बलात्कार प्रकरणातील आरोपीला गजाआड करण्यात आले होते.

विशेष महानिरीक्षकपदी पदोन्‍नती मिळालेल्या 5 पोलिस उप महानिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे :-

1. प्रताप आर. दिघावकर (पोलिस उप महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, मुंबई – पदोन्‍नतीने)

2. मनोज एस. लोहिया (पोलिस उप महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई – पदोन्‍नतीने)

3. प्रदीप व्ही. देशपांडे (अप्पर पोलिस आयुक्‍त गुन्हे, पुणे शहर ते संचालक, महाराष्ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी, पुणे),

4. दत्‍तात्रय यादव मंडलिक (पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुन्हे अभिलेख कक्ष, पुणे – पदोन्‍नतीने)

5. केशव जी. पाटील (अप्पर पोलिस आयुक्‍त, प्रशासन, ठाणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण, प्रशिक्षण संचालनालय, मुंबई)

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like