पचनसंस्थेचे विकार म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’ अन् ‘कारणं’ ? ‘हे’ यावरील उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – पचनसंस्थेचे विकार म्हणजे काय ? पोट, लहान आतडी आणि कोलन तसेच यकृत, पित्ताशय, बिलीअरी ट्रॅक्ट आणि स्वादुपिंड सारखे अवयव आणि पचन मार्ग संबंधित विकारांना पचनसंस्थेचे विकार किंवा गॅस्ट्रोइंटेस्टीनल विकार असं म्हटलं जातं. यात बद्धकोष्ठता, अतिसार, क्रॉन रोग, इरीटेबल बॉवेल सिंड्रोम (आयबीएस), छातीत जळजळ, गॉलस्टोन, कोलायटिस, अल्सर, हर्निया अशा इतरही अनेक आजारांचा समावेश आहे.

काय आहेत याची लक्षणं ?

– पोट फुगल्यासारखं वाटणं
– गॅस पास होणं
– बद्धकोष्ठता
– अतिसार
– शौचात रक्त येणं
– छातीत जळजळ होणं
– मळमळणं आणि उलट्या होणं
– पोटात दुखणं
– गिळताना त्रास होणं
– वजन वाढणं किंवा कमी होणं
– मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल होणं

काय आहेत याची कारणं ?

– मायक्रोबियल संसर्ग
– अन्ननलिकेत जळजळ
– पाचन एंझायीमची कमतरता
– आतड्यांना पुरेसं रक्त न मिळणं
– गॉलस्टोन्स तयार होणं
– अँटी इंफ्लेमेटरी औषधांचे परिणाम
– ताण
– धूम्रपान
– दारूचं सेवन
– चरबी वाढवणाऱ्या पदार्थांचं अतिसेवन
– मसालेदार अन्नाचं सेवन
– काही अनुवांशिक कारणंही असू शकतात.
– पोस्ट सर्जिकल कारणंही असू शकतात.
– ऑटो इम्युन इंफ्लेमेटरी आणि क्रॉनिक रोग
– वाढतं वय

काय आहेत यावरील उपाय ?

1) आपले ट्रीगर घटक ओळखा – पचन संस्था खराब कणाऱ्या सवयी आणि विशिष्ठ सवयींवर लक्ष केंद्रीत करा. डॉक्टर आणि डाएटीशियनच्या सल्ल्यानं यावर मात करू शकता.

2) औषधं – लक्षणांवर अवलंबून अँटी डायरियल, अँटी नौशिया, अँटी एमेटीक आणि अँटीबायोटीक्स दिले जाऊ शकतात.

3) शस्त्रक्रिया – गॅलस्टोन, अ‍ॅपेंडीसायटीस आणि हर्निया सारख्या विकारांसाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

4) एंडोस्कोपी – गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्रावासाठी होमस्टॅटिक औषधांची एंडोस्कोपी डिलीव्हरी दिली जाऊ शकते.

याव्यतिरीक्त तुम्ही रोजच्या जीवनात काही बदल करूनही हे विकार टाळू शकतात. हे बदल पुढील प्रमाणे –

1) व्यायाम
2) योग आणि ध्यान
3) स्वच्छतापूर्ण आहाराची सवय
4) निश्चित आणि नियमित आहार
5) आतडे पुन्हा भरण्यासाठी प्रोबायोटीक्सचा वापर

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.