Digilocker App | चोरी किंवा हरवण्यापासून Aadhaar, PAN आणि Driving License असे वाचवा, कुणीही लावू शकणार नाही हात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधीत अतिशय महत्वाचे कागदपत्र आहेत. तुमचे Aadhaar, PAN आणि Driving License किंवा इतर आवश्यक कागदपत्र चोरी होणे किंवा हरवण्यापासून वाचवण्यासाठी भारत सरकारन डिजीलॉकर (DigiLocker) अ‍ॅप आणले आहे. DigiLocker App कशाप्रकारे कागदपत्र सुरक्षित ठेवते ते जाणून घेवूयात… Digilocker App | Digilocker want to secure aadhaar pan and driving license than save it in digi locker know step by step process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

* DigiLocker वर कसे बनवावे अकाऊंट?

– सर्वप्रथम digilocker.gov.in किंवा digitallocker.gov.in वर जा.

– यानंतर उजवीकडे Sign Up वर क्लिक करा.

– नवीन पेज ओपन होईल, जिथे आपला मोबाइल नंबर नोंदवा.

– यानंतर DigiLocker तुमच्याद्वारे नोंदवलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवेल तो नोंदवा.

– यानंतर आपले यूजरनेम आणि पासवर्ड सेट करा.

– आता तुम्ही DigiLocker चा वापर करू शकता.

– डाऊनलोड करून सुद्धा वापरू शकता.

* DigiLocker मध्ये कसे अपलोड करावे डॉक्युमेंट?

– DigiLocker वर लॉग इन करा

– डावीकडे Uploaded Documents वर जा आणि अपलोडवर क्लिक करा.

– डॉक्यूमेंटबाबत संक्षिप्त माहिती लिहा.

– यानंतर अपलोड बटनवर क्लिक करा.

किती सुरक्षित आहे Digi Locker?

डीजी लॉकर तेवढेच सुरक्षित आहे जेवढे आपले आपले बँक अकाऊंट आणि नेट बँकिंग. digi locker मध्ये आपल्याला एक यूजर आयडी आणि पासवर्ड बनवावा लागतो. यानंतर आपल्याला तो आधार कार्डशी लिंक करावा लागतो. सोबतच आपला मोबाइल नंबर सुद्धा रजिस्टर करावा लागतो. यानंतर डीजी लॉकरमध्ये अकाऊंट तयार होते.

Web Title :  Digilocker App | Digilocker want to secure aadhaar pan and driving license than save it in digi locker know step by step process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया