Digital Artist | बेडरूममधून बाहेर न पडता महिलेने उभा केला बिझनेस, एका महिन्यात कमावले 38 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Digital Artist | पतीपासून विभक्त झाल्यानंतर एक महिला पूर्णपणे खचली होती. यादरम्यान तिच्या आवडत्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. या घटनांनी ती हादरून गेली होती. सुमारे तीन आठवडे ती अंथरुणावरुन उठली नाही. पण त्यानंतर तिने स्वत:च्या क्षमता ओळखायला सुरुवात केली आणि स्वत:ला डिजिटल आर्टिस्ट (Digital Artist) म्हणून प्रस्थापित केले. आता ती महिला घरात बसून तिच्या बेडरूममधून दरमहा 40 लाख रुपये कमावत आहे.

 

डिजिटल आर्टिस्ट Michaela Morgan ची ही कथा आहे. जी यूकेच्या वेल्सची रहिवासी आहे. nypost.com च्या रिपोर्टनुसार, लग्न मोडल्यानंतर आणि डॉगीच्या मृत्यूनंतर Morgan खूप अस्वस्थ झाली. एकवेळ अशी आली की तिला अंथरुणातून उठताही येत नव्हते. तिने घरातून बाहेर पडणे आणि लोकांना भेटणेही बंद केले होते.

 

पण नंतर Michaela Morgan बिझनेस, स्वयं सहायता आणि डिजिटल आर्टबद्दल वाचायला सुरुवात केली. या गोष्टींची तिला लहानपणापासूनच आवड होती. या वेळी Michaela Morgan ने संगणकाद्वारे कलाकृती जिवंत करण्याची आकर्षक प्रक्रिया शोधून काढली. (Digital Artist)

 

वेल्स ऑनलाइन सोबत बोलताना Michaela Morgan म्हणाली – गेल्या वर्षी (2019) मी पतीपासून वेगळी झाले. त्यानंतर दोन आठवड्यांत कर्करोगाशी लढा देत असलेल्या माझ्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. या घटनांनी मला हादरवून सोडले.

Michaela म्हणते – यानंतर मी तीन आठवडे अंथरुणावर घालवले. तो एक भयंकर काळ होता पण मला असे काहीतरी करायचे होते ज्यामुळे मला दररोज अभिमान वाटेल.

 

असा सुरू केला बिझनेस
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या Michaela Morgan ने सांगितले की, यानंतर मी शक्य तितके पेंटींग करू लागले. पण एका क्षणी मला जाणवले की माझे काम छापणे खरोखर कठीण आहे. मॉर्गन म्हणते की व्यवसाय म्हणून काम सुरू करण्यासाठी प्रारंभिक खर्च आयपॅड प्रो सारख्या उपकरणासाठी काही हजार पौंड होता. मी डिजिटल आर्टबद्दल वाचले होते, त्यामुळे याच दिशेने पुढे गेले.

 

कोट्यवधीची होतेय कमाई
मिशेला मॉर्गन म्हणाली, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान,
मी स्वत:च्या बेडरूममध्ये हा व्यवसाय सुरू केला आणि डिजिटल आर्टीस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. (Digital Artist)

गेल्या वर्षी एप्रिलच्या शेवटी आणि जुलैच्या अखेरदरम्यान,
मॉर्गनने तिच्या कामाद्वारे (मिमो आर्ट्स) एक कोटीहून अधिक किमतीची पेंटिंग विकली,
जी तिने तिच्या बेडरूममध्ये बसून तयार केली.
डिजिटल आर्टिस्ट म्हणून ती आता दरमहा 38 लाख रुपयांपर्यंत कमावते.
ती अनेक नामांकित ब्रँडसोबत काम करत आहे.

Michaela म्हणाली की, गेल्या वर्षीपर्यंत मला डिजिटल आर्टबद्दल फारशी माहिती नव्हती.
पण आता मी मागे वळून पाहिले तर मला वाटते की मी 10 वर्षांपूर्वी ते सुरू करू शकले असते.
सध्या, मॉर्गन तिच्या आर्टमधील आकर्षक यशाचा आनंद घेत आहे. मात्र, तरीही तिला खूप मेहनतीची गरज असल्याचे ती सांगते.

 

Web Title :- Digital Artist | woman earning huge money without leaving bedroom business success story

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा