Digital Banking In India | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँका सुरू होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Digital Banking In India | मोदी सरकारकडून (Modi Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या 75 जिल्ह्यांत 75 डिजिटल बँक (Digital Banking In India) सुरू करण्यात येणार आहे. यावर काम सुरू असून, लवकरच याचा शुभारंभ केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 15 ऑगस्ट 2022 रोजी या बँकांचे लोकार्पण करू शकतात. अशी माहिती मिळत आहे. (75 digital banks will be launched in 75 districts of the country)

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 2022 – 23 वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंगच्या विस्ताराची घोषणा केली होती.
तसेच, वित्तमंत्री सीतारामन यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय घोषणेंतर्गत, डिजिटल बँकांच्या स्थापनेसाठी एक निश्चित आराखडा तयार करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने (Reserve Bank) एका समितीची स्थापन केली होती. (Digital Banking In India)

 

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, खासगी क्षेत्रातील दहा बँका आणि एका लघु वित्त बँकेने डिजिटल बँका कार्यान्वित करण्यासाठी काम सुरू केले आहे.
त्याचबरोबर डिजिटल बँकिंग प्रारूप, डिजिटल बँकिंग प्रदान करू शकणाऱ्या सेवा – सुविधा,
बँकांच्या कामकाजावर देखरेख, सायबर सुरक्षा आणि इतर माहिती तंत्रज्ञानासंबंधित घटक,
डिजिटल बँकिंग क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी बँकांनी निभावण्याची भूमिका इत्यादींचा समावेश आहे.
समितीच्या शिफारशींच्या आधारे, डिजिटल बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम रूप देण्यात आले आहे,
असं रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला (Central Government) दिलेल्या शिफारशीमध्ये म्हटले आहे.

 

डिजिटल बँकाचे स्वरूप आणि कामकाज नेमकं कसे असणार ?

डिजिटल बँक शाखा (Digital Bank Branch) या डिजिटल बँकिंग उत्पादने (Digital Banking Products) आणि सेवा वितरित करण्यासाठी व बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने, सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र आहे.
बहुतांश बँकिंग सेवा या वर्षभर अविरत, अखंडपणे उपलब्ध असतील आणि ग्राहक ते स्वयंसेवेद्वारे वापरण्यास सक्षम असतील.
जे ग्राहकांना स्वयं – सेवाअंतर्गत, किफायतशीर, कागदरहित, सुरक्षित वातावरणात बँकांची उत्पादने आणि सेवांचा डिजिटल अनुभूती देईल.
व्यवसाय आणि सेवांमधून उद्भवलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुरेशी डिजिटल यंत्रणा येथे कार्यरत असणार आहे.
तसेच, या बँकांद्वारेही ठेवी स्वीकारणे आणि कर्जासारख्या सेवा पुरविल्या जातील.
बँकांच्या डिजिटल बँकिंग कक्षांना, बँकिंग आऊटलेट, शाखाच मानले जाईल, असं सांगितलं आहे.

 

Web Title :- Digital Banking In India | pm narendra modi to inaugurate 75 digital banks on 15 august 2022 digital banks operational country freedom banks

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा