Video : भर चौकातील होर्डिंगवर प्ले झाला तब्बल अर्धा तास अश्‍लील व्हिडिओ, सर्वत्र ‘बोंबाबोंब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत एका रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगवर अचानक पॉर्न व्हिडिओ प्ले झाला, एवढेच नाही तर हा व्हिडिओ अर्धा तास सुरुच होता. काही वाहन चालकांनी या व्हिडिओचे आपल्या मोबाइलमध्ये चित्रण करुन पोलिसात तक्रार दाखल केली. आता ही घटना सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे लोक सोशल मिडियावर आपला संताप व्यक्त करत आहे.

हा प्रकार मिशिगन भागात घडला, मिशिगन औबर्न हिल्समध्ये रस्त्याच्या कडेला जाहिरातीचे होर्डिंग आहे. याच होर्डिंगवर अचानक पॉर्न व्हिडिओ प्ले झाला. यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी हा प्रकार आपल्या मोबाइल कॅमेरात कैद केला आणि याची तक्रार पोलिसात दिली. काहींनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ स्टॉप करण्यात आला.

जस्टीन कामो या ट्रक चालकांने सांगितले की मी ट्रक चालवत असताना मला अचानक हा व्हिडिओ होर्डिंगवर प्ले झाल्याचे दिसले. तो व्हिडिओ लेस्बियन होता. एका चित्रपटगृहात अंधारात चित्रपट पडद्यावर दाखवल्याप्रमाणे हा व्हिडिओ प्ले झाला. या घटनेने अनेक वाहन चालकांचे लक्ष विचलित झाले.

घटनास्थळी असलेले चक मॅकहॉन म्हणाले, पहिल्यांदा मला वाटले हा व्हिडिओ एखादी जाहिरात आहे, परंतू नंतर लगेचच लक्षात आले की हा पॉर्न व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जवळपास 20 ते 25 मिनिटे सुरु होता. यामुळे अनेक वाहन चालकांचे लक्ष विचलित झाले, यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.

Visit : Policenama.com