Digital Currency in India | भारतात कधी सुरू होऊ शकते डिजिटल करन्सीची ट्रायल? RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Digital Currency in India | भारतात डिजिटल करन्सीसाठी टेस्टिंग डिसेंबर 2021 पर्यंत सुरू केली जाऊ शकते (Testing for digital currency in India may start by December 2021). हे वक्तव्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Reserve Bank of India Governor Shaktikant Das) यांनी एका खासगी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. केंद्रीय बँक डिजिटल चलनास सीबीडीसीचे रूप समजले जाते, डिजिटल चलन ऑनलाइन प्रकारे लीगल टेंडर म्हणून प्रस्तावित केले जाते. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर डिजिटल करन्सी हे प्रचलित असलेल्या करन्सीचे ऑनलाइन व्हर्जन असेल.

RBI अनेक बाजूंवर विचार करतेय

खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरबीआय गव्हर्नर म्हणाले, आरबीआय डिजिटल करन्सीबाबत खुप सतर्क आणि सावध आहे.
हे पूर्णपणे नवीन प्रॉडक्ट आहे, ज्याबाबत आम्ही गंभीर आहोत.
आरबीआय डिजिटल करन्सीची सुरक्षा, मॉनिटरी पॉलिसी, तिचा प्रभाव आणि प्रचलित रोकडसह अनेक बाजूंवर विचार करत आहे.

डिस्ट्रीब्यूटेड लेजर टेक्नॉलॉजी

त्यांनी याबाबत पुढे म्हटले की, वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही पूर्णपणे सक्षम होऊ आणि एका अशा स्थितीत येऊ की डिजिटल करन्सीची पहिली चाचणी सुरू करू शकतो.
केंद्रीय बँक डिजिटल करन्सीसाठी एक सेंट्रल लेजरचा वापर करणे आणि अनेक पार्टिसिपेंट्सचा डिजिटल डेटाबेस ठेवण्याच्या ऑपशनवर विचार करत आहे.
ज्यास डिस्ट्रीब्यूटेड लेजर टेक्नॉलॉजी सुद्धा म्हटले जाते.

 

डेटाबेसची मालकी, संचालन आरबीआयकडे

सेंट्रलाईज लेझरच्या डेटाबेसची मालकी आणि संचालन केवळ केंद्रीय बँकेकडे असेल.
विशेषता, यूके, चीन आणि युरोपसह अनेक प्रमुख अर्थव्यवस्था डिजिटल चलनाच्या वापराचा शोध घेत आहेत. रोखीच्या वापरात घसरण आणि क्रिप्टोकरन्सीबाबत लोकांचा वाढत्या कल पाहिल्यानंतर आरबीआयने ट्रायलवर विचार करणे सुरू केले आहे.

बिटकॉईनच्या लोकप्रियतेमुळे दबाव

आरबीआयला मोठ्या कालावधीपासून याबाबत प्रश्न विचारला जात आहे की, अखेर स्वताची डिजिटल करन्सी कधी सुरू करणार.
विशेषता बिटकॉईनची लोकप्रियता वाढल्यानंतर तर हा प्रश्न आणि आरबीआयवर दबाव आणखी वाढू लागला आहे.
आरबीआयने तर बिटकॉईनवर बॅन लावला होता, परंतु सुप्रीम कोर्टाने यावरील बॅन हटवला होता.

 

Web Title : Digital Currency in India | rbi governor told when can trial of digital currency start in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Smartphone वापरताना करू नका ‘या’ 10 चूका, अन्यथा फोनचा बॉम्बसारखा होऊ शकतो स्फोट; जाणून घेऊन करा बचाव

Pune Congress | जनतेत व पक्षाच्या आंदोलनात न दिसणारे झाले पदाधिकारी ! निवडीवरून शहर कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर

Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजना ! ‘एस.जी.आय.’ सल्लागार कंपनी प्रकल्पातून बाहेर पडली, नवीन सल्लागार नेमण्याचा खर्च वाढला