Digital Garage King | पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण बनला ‘डिजिटल किंग’

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Digital Garage King | राज्यात असे अनेक तरुण आहेत ज्यांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शालेय जीवनापासूनच कमवा आणि शिका (Earn and Learn) अशी परिस्थिती त्यांच्यावर येते. त्यामुळे अनेकजण सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्यासाठी घर आणि गाव सोडून पुणे, मुंबई (Pune-Mumbai) यांसारख्या शहरात अभ्यासासाठी स्थलांतरित होतात. बरेच विद्यार्थी पुण्यात येताना पोलीस भरती (police recruitment) , MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा विचार करून येत असतात. मात्र, कालांतराने त्यांचा प्रवास बदलतो आणि शिक्षणपूर्ण झाल्यानंतर ते वेगळ्या क्षेत्राकडे वळतात. असाच एक विद्यार्थी जो पोलीस भरती होण्याच स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आला आणि पुढे तो मुंबईला स्थायिक झाला. बिल्डरकडे (Builder) काम करता करता प्रसार माध्यमांकडे वळला आणि आज त्याने आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्या विद्यार्थ्याविषयी आणि अर्थातच डिजिटल मीडियामध्ये (Digital Garage King) सर्वांना सुपरिचित असलेल्या किरण यादव (Kiran Yadav) यांच्या प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

 

 

सातारच्या ऐका खेड्यामध्ये जन्मलेल्या किरण (Kiran Yadav) यांचा माध्यमांच्या दुनियेतला प्रवास सोपा नव्हता. कारण दहावीला असताना वडिलांच्या अकाली निधनामुळे बोर्डाच्या परीक्षेत अपयशाचा सामना त्यांना करावा लागला. तरीही खचून न जाता घरची परिस्थिती नसल्यामुळे काम करत करत दहावीच्या परीक्षेत न सुटलेले विषय एटीकेटीची परीक्षा देऊन सोडवायचा निर्णय त्यांनी घेतला. म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे, या म्हणी प्रमाणे त्यांच्या अपार मेहनतीला यश आले आणि ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. ग्रामीण भागात पुढे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावातल्या इतर मुलांप्रमाणे आपण ही पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावेत असा विचार किरणच्या मनात घोळू लागला.

त्यामुळे 12 वी च्या निकालानंतर त्यांनी पुण्याला मावशीकडे राहण्याचा निर्णय घेतला. गावी राहत असलेल्या आईला आणि लहान भावाला थोडीफार पैशांची मदत होईल असे काम बघून आपण महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत पोलीस भरती सराव करायचा हे त्यांनी मनाशी निश्चित केले. ग्रामीण भागातील इतर मुलांप्रमाणे शहरात आल्यानंतर पोलीस भरतीच्या अभ्यासाची गती किरण यांनी वाढवली होती. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील एका महाविद्यालयात त्यांनी उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला. बीकॉम पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अद्याप पोलीस भरतीच्या प्रक्रियेत काही विशेष यश प्राप्त न झाल्यामुळे मुंबईच्या मावशीकडे जाऊन नोकरीसाठी प्रयत्न करावेत असा विचार करून पुणे सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

 

 

बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यामुळे एका बिल्डरच्या कार्यालयात काम किरणला काम मिळाले. त्या ठिकाणी काम करत असताना एके दिवशी त्या बिल्डरने एका डिजिटल वेबसाईट मध्ये गुंतवणूक केल्याचे कळले आणि त्या मालकांनी किरण यांना नवीन कार्यालयात काम करण्याची संधी दिली. खऱ्या अर्थाने प्रसार माध्यमांच्या दुनियेत किरणचे हे पहिले पाऊल होते. सुरुवातीला कॉन्टेन्ट एक्सिकटिव्ह म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वच नवीन असल्यामुळे शिकायला पुष्कळ मिळत होते.

कंपनी चे सीईओ स्वरीत टंडन यंग व्यक्तिमत्त्व होतं.
चलाख, चपळ, हुशार असलेल्या टंडन यांना आपल्या हुशारीचा कधीच गर्व वाटत नसे.
त्यामुळे किरण (Digital Garage King) यांना त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली.
टंडन यांचे मार्गदर्शन आणि भविष्यातील माध्यमांची गरज ओळखून किरण (Digital Garage King Kiran Yadav) यांनी ठाण्यामधील एका संस्थेतून डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला.
त्यानंतर या कंपनीत त्यांची प्रगती होत गेली.
दरम्यान स्वतंत्र अशा डिजिटल गॅरेजची (Digital Garage) निर्मिती किरण यांनी केली. त्यांची ती स्वतंत्र कंपनी होती.
ज्या मार्फत ते कॉन्टेन्ट निर्मिती तसेच मार्केटिंग करू लागले.
सलग 2 वर्ष या कंपनीत काम केल्यानंतर प्रसार माध्यमातील इतर कंपनीमध्ये अनुभव घेण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी नवीन प्रवासाला सुरुवात केली.

 

 

त्यावेळी नव्याने आपलं महानगर डिजिटल स्वरूपात मुंबई शहरात सुरू झाले होते.
किरण यांना आपलं महानगर मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर अवघ्या काही दिवसात किरण यांनी सर्वांची मने जिंकली.
वर्षभर महानगर सोबत काम केल्यानंतर आलेल्या अनुभवाच्या जोरावर किरण यांनी अनेक नेत्यांचे डिजिटल मार्केटिंग करायला सुरुवात केली.
अनेक राजकीय लोकांसाठी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली.

अनेक राजकीय नेतृत्वांनी किरण मधील सच्च्या माणूस ओळखला आणि त्यांना संधी दिली आजपर्यंत अनेक
राजकीय लोकांना त्यांच्या राजकीय वाटचालीत प्रसिद्धीच्या दृष्टीने डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या किरण यांचा डिजिटल प्रवास थक्क करणारा आहे.
दरम्यान अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये त्यांनी पदार्पण करत लॉकडॉनमध्ये कोरोनाच्या महामारीत लोकांना रोजगार निर्मिती करून दिली.
अशाप्रकारे सातारच्या (Satara) एका खेड्यातून आलेल्या या तरुणाने मुंबईसारख्या शहरात आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

Web Title : Police Inspector Transfer | kondhwa and faraskhana police station, two inspector transfer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update