‘डिजिटल इंडिया’चे वाजले ‘तीन तेरा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशात हलकल्लोळ माजला. बँकेसमोर रांगा लागल्या. तेव्हा लोकांनी कॅश व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहार करावे असे आवाहन केले होते. मात्र, आता या घटनेला तीन वर्ष होत असून डिजिटल व्यवहार वाढले असले तरी चलनातील नोटांचे प्रमाण तब्बल १७ टक्क्यांनी वाढले आहे. बनावट नोटा पुन्हा बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या असून बँकांमधील गैरव्यवहाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. एक प्रकारे डिजिटल इंडिया चे तीन तेरा वाजले आहेत.

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांचा नोटा रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी या दोन नोटांचे चलनी नोटांमध्ये ८६ टक्के इतके प्रमाण होते.

त्यानंतर आता मार्च २०१९ अखेर चलनातील नोटांची संख्या ६.२ टक्क्यांनी वाढली आहे. सध्या चलनात २१.१० लाख कोटी रुपये मुल्याच्या नोटा आहेत. त्यात ५०० रुपयांच्या सर्वाधिक नोटा असून चलनात असलेल्या नोटांच्या मुल्यांपैकी तब्बल ५१ टक्के मूल्य ५०० रुपयांच्या नोटांचे आहे. त्याचबरोबर २ हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण ३१ टक्के इतके आहे. यापूर्वी हे प्रमाण ३७ टक्के इतके होते. मात्र, व्यवहारात २ हजार रुपये सुट्टे मिळण्यात सामान्यांना त्रासदायक ठरत असल्याचे लक्षात आल्यावर रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा छापण्याचे प्रमाण कमी केले. तसेच बाजारात या नोटा कमी प्रमाणात आणल्या. त्यामुळे एकूण चलनातील नोटांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरुन ३१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

दुसरीकडे डिजिटल व्यवहारातही वाढ झाली आहे. २०१७ -१८ मध्ये १ हजार ५८९ कोटींचे व्यवहार झाले होते. यंदा ते २ हजार ४५१ कोटीं वर गेले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –