Digital Life Certificate | 1 ऑक्टोबरपासून लागू होतोय पेन्शनसंबंधी ‘हा’ खास नियम, तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली : Digital Life Certificate | 1 ऑक्टोबर 2021 पासून पेन्शनचा एक विशेष नियम लागू होत आहे. त्याचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पेन्शन मिळवण्यात अडचण येऊ शकते. हा नवीन बदल डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) बाबत आहे. आता हे सर्टिफिकेट देशातील सर्व हेड पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रमाण सेंटर म्हणजे JPC मध्ये जमा करता येईल.

ज्या पेन्शनर्सचे वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ते 1 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतील. उर्वरित पेन्शनर्स 1 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) जमा करू शकतील.

जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचे काम पोस्ट ऑफिसद्वारे सुरू होत आहे. यासाठी भारतीय पोस्ट विभागाने सांगितले आहे की, जीवन प्रमाण सेंटरचा आयडी वेळेपूर्वी अ‍ॅक्टिव्हेट करा, जर तो अगोदरपासून बंद असेल तर. ज्या हेड पोस्ट ऑफिसमध्ये जीवन प्रमाण सेंटर नाहीत, त्यांना ताबडतोब हे सेंटर बनवण्याचा आदेश जारी केला आहे.

सरकारनुसार जीवन प्रमाण सेंटर बनवल्यानंतर आयडी अ‍ॅक्टिव्हेट करावा लागेल. हेच काम पोस्ट ऑफिसमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी सुद्धा होणार आहे. याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 ठरवली आहे.

पेन्शनर्सला काय करावे लागेल

हे काम पूर्णपणे ऑनलाईन झाल्याने पेन्शनर्सला बँकेच्या ब्रँच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन जमा करण्यासाठी घरबसल्या काम करता येऊ शकते. यासाठी पेन्शनरला आधार नंबरवर तयार डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचा पुरावा घ्यावा लागेल. अगोदर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हाताने हे सर्टिफिकेट जमा करावे लागत होते. परंतु आता ही फॅसिलिटी ऑनलाइन मिळत आहे.

ऑनलाइन जीवन प्रमाण (Digital Life Certificate) मध्ये एक यूनिक आयडी मिळतो जो DLC चे काम पूर्ण होताच जनरेट होतो.
याच आधारावर जीवन प्रमाणपत्र प्रोसेस होते आणि ते ऑटोमेटिकली बँक ब्रँच किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेत पाठवले जाते.
यावरून समजते की, पेन्शनर अजूनही जिवंत आहे.
याच आधारावर पेन्शरच्या खात्यात पैसे रिलिज केले जातात.

डिजिटल प्रमाणपत्राचा फायदा

यामुळे ज्येष्ठ पेन्शनर्सला बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या मोठ्या रांगेत थांबावे लागणार नाही.
आता सर्टिफिकेट पाठवण्याचे काम घरबसल्या होईल आणि त्याच आधारावर खात्यात पैसे येतील.
आणखी एका नियमात सरकारने डिजिटल जीवन प्रमाणपत्र घेण्यासाठी आधार एैच्छिक बनवले आहे.

हे देखील वाचा

FB Account Cloning | Facebook वर ‘या’ नावानं फ्रेन्ड रिक्वेस्ट आली तर राहा सावध, अन्यथा बसेल मोठा फटका; जाणून घ्या

Ramdas Kadam | ‘वैभव खेडेकरांच्या आरोपांना भीक घालत नाही, ते मनसेचे की राष्ट्रवादीचे?’ असा खेडच्या जनतेला प्रश्न – रामदास कदम

Live In Relationship |’लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये खर्च दोघांनी करावा किंवा कुणी एकाने, हा गुन्हा नाही – हायकोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Digital Life Certificate | digital life certificate submission by pensioners to start from october 1 check all details how to file it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update