Pension साठी LIC कार्यालयात जाऊन जमा करावे लागणार नाही Digital Life Certificate, असे होईल काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Digital Life Certificate | पेन्शन मिळवण्यासाठी (Pension) आता तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC Office) जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) जमा करावे लागणार नाही. तुम्ही किंवा तुमची मुले हे काम ऑनलाइन सहज करू शकता. यासाठी, एलआयसीच्या मोबाइल अ‍ॅपला भेट देऊन, तुम्ही आधार आधारित डिजिटल लाईफ प्रमाणपत्र सहज मिळवू शकता.

 

हे मोबाईल अ‍ॅप LIC च्या वैयक्तिक पेन्शन प्लॅन (IPP) वार्षिकी आणि कर्मचारी पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा देते. या अ‍ॅपवर एक ‘सुविधाकर्ता‘ पर्याय देखील आहे, ज्याद्वारे निवृत्तीवेतनधारकांव्यतिरिक्त इतर यूजर त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत करू शकतात.

 

आपण या स्टेपद्वारे मिळवू शकता प्रमाणपत्र :

Google Play Store वरून डाउनलोड करा.

आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पेन्शन पॉलिसीचा तपशील द्या.

सेल्फी घ्या.

आता तुमच्या समोर डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) असेल.

हे काम फॅसिलिटेटरद्वारे करत असाल, तर या स्टेप फॉलो कराव्या लागतील.

फॅसिलिटेटरची माहिती द्या

पेन्शनधारकाचे (Pensioners) आधार आणि पॉलिसी तपशील प्रदान करा

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP (वन टाईम पासवर्ड) व्हेरिफाय करा.

पेन्शनधारकाचे छायाचित्र काढावे लागेल.

या सुविधेचा लाभ मिळविण्यासाठी, पॉलिसीधारकांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य आहे.

पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) सादर करावे लागते. हे कागदपत्र एक प्रकारे ते जिवंत असल्याचे सिद्ध करते. हे सादर करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की अशा लोकांची पेन्शन चालू राहावी. ते जमा न केल्यास त्यांचे पेन्शन अडकू शकते.

 

एलआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत या सुविधा :
एलआयसीच्या वेबसाईटवर (www.licindia.in) तुम्हाला ऑनलाइन पॅन नोंदणी, ऑनलाईन पॉलिसी पॅन स्थिती तपासणे, ऑनलाइन पत्ता बदलणे, ऑनलाइन ENACH नोंदणी, प्रीमियम पेमेंट, LIC क्रेडिट कार्डद्वारे प्रीमियम पेमेंट आणि ऑनलाइन पॉलिसी खरेदी इत्यादी सुविधा मिळतात.

 

Web Title :- Digital Life Certificate | lic jeevan saakshya app now policyholders can submit digital life certificate without visiting office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vitamin C Deficiency | सावधान ! ‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस, दात आणि त्वचेला धोका; दृष्टी होते कमी

 

Pune Crime | लोणी काळभोरच्या हद्दीतून गुटख्याच्या 150 पोत्यांसह 81 लाखाचा माल जप्त; पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

 

Face Packs For Oily Skin | वापरा ‘हे’ फेस पॅक आणि मिळवा चमकदार, ऑईल फ्री चेहरा