2020 मध्ये देशाला मिळणार पहिली ‘डिजीटल मॉल’, घर बसल्या करू शकता ‘शॉपिंग’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन खरेदीवर तितकासा विश्वास लोकांचा बसलेला नाही कारण अनेकदा अशा खरेदीबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे आता 2020 मध्ये ‘डिजिटल मॉल ऑफ एशिया’ नावाने देशाला पहिला डिजिटल मॉल मिळणार आहे. या मॉलमध्ये तुम्ही तुमच्या कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलने फिरून खरेदी करू शकता.

कसे काम करेल हा मॉल ?
सामान्य मॉल प्रमाणे हा मॉल देखील काम करणार आहे. यामध्ये तुम्ही घरबसल्या आपल्या आवडीचे प्रोडक्‍ट खरेदी करू शकणार आहे. एवढेच नाही तर आवडलेले प्रोडक्ट तुम्ही ट्राय देखील करू शकणार आहात मात्र ही ट्रायल फिजिकल पेक्षा वेगळी असणार आहे.

डिजिटल मॉलचे आपले वेगळे नियम आणि कायदे असणार आहेत या व्यतिरिक्त विक्रेत्यांना व्हर्च्युअल स्पेस भाड्याने मिळणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डिजिटल मॉलमध्ये विक्रेते दुकान भाड्याने घेऊ शकतील. विशेष म्हणजे मोठं मोठ्या ब्रँड कंपन्यांनसोबत किरकोळ व्यापाऱ्यांनकडून सुद्धा फक्त मासिक भाडे घेतले जाईल.म्हणजेच विक्रेत्यांना आता कमिशनचे टेन्शन राहणार नाही.

चीन सोबत इतर देशामध्ये देखील होणार सुरु
भारतात डिजिटल मॉलची सुरुवात दिल्लीमध्ये होणार आहे. याचप्रमाणे लखनऊ,बंगलोर, मुंबई, चैन्नई, हैद्राबाद,पुणे, चंदिगढ, जयपूर, म्हैसूर, कोयंबदूर, अहमदाबाद, देहराडून आणि लुधियाना या सर्व ठिकाणी डिजिटल मॉल सुरु करण्याची योजना आहे. भारताव्यतिरिक्त हा डिजिटल मॉल चीन, जापान, दक्षिण कोरिया, सिंगापूर मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये देखील लॉंच होणार आहे.

You might also like