‘ड्रोन’च्या मदतीनं पहिल्यांदाच तयार होणार भारताचा ‘डिजीटल’ नकाशा, मिळणार एकदम ‘करेक्ट’ माहिती

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सर्वे ऑफ इंडिया नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भारत डिजिटल नकाशा तयार करण्याच्या तयारीत आहे. हे काम ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. याच जेवढी आकडेवारी आकाशातून घेण्यात येईल तेवढीच आकडेवारी जमीनीवरुन जमा करण्यात येईल. भारत सरकारचे सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी विभाग डिजिटल मॅपिंगच्या माध्यमातून दोन वर्ष सर्वे ऑफ इंडियाला मदत करेल.
 
हा प्रोजेक्ट महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणामध्ये सुरु झाली आहे. त्यासाठी तीन डिजिटल केंद्र उभारण्यात आले. यातून देशातील भौगोलिक डेटा जमा करण्यात येईल. पंरतू राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता संवेदनशील स्थानांची मॅपिंग करण्यात येणार नाही.
 
सर्व ऑफ इंडियाने सांगितले की नकाशातून 10 सेंटीमीटर पर्यंत दृश्य सहज दिसेल. सांगण्यात येत आहे की सध्या 2500 पासून जास्त ग्राऊंड कंट्रोल पॉइंट्स आहेत आणि याच आधारे मॅपिंग करण्यात येईल. हे ग्राऊंट कंट्रोल पॉइंट्ंस देशातील सर्व 30 ते 40 किमी दरम्यान समान पद्धतीने वाटण्यात येईल.

नव्या मॅपिंगसाठी आम्ही वर्चुअल CORS  सिस्टिमचा वापर करण्यात येईल. त्यातून काही सेकंदात ऑनलाइन 3D पोजिशनिंग मिळेल. म्हणजेच एका क्लिक मुळे कोणत्याही क्षेत्राची 3D पोजिशन उपलब्ध होईल. सॅटेलाइटमुळे निश्चित होणारे  GPS सिस्टम, गुगल मॅप्सच्या तुलनेत डिजिटल नकशा जास्त स्पष्ट असेल.