Digital News Portals | उच्च न्यायालयाकडून ‘न्यूज पोर्टल्स’संबंधी नव्या नियमांच्या स्थगितीला नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – डिजिटल न्यूज पोर्टल्ससंबधी (Digital News Portals) दाखल एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन आयटी नियमांचे (IT) पालन करण्यासाठी डिजिटल न्यूज पोर्टलच्या आदेशास स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) सोमवारी (दि. 28) नकार दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे, की सध्या आयटी नियम 2021 वर स्थगिती देण्याच्या याचिकाकर्त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याचे म्हटले आहे. याचिकेवर सोमवारी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. जसमीत सिंह (Chief Justice d. N. Patel and Justice. Jasmeet Singh) यांनी स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

द वायरचे संपादक एम. के. वेणू तसेच द न्यूज मिनिटचे मुख्य संपादक धन्या राजेंद्रन यांनी या नव्या नियमांना स्थगिती द्यावी याबाबत याचिका दाखल केली होती. नवे आयटी नियम डिजिटल न्यूज पोर्टल्सचे मोठ नुकसान करणारे आहेत. हे नियम स्वतंत्र पत्रकारितेच्या अधिकाऱ्यांच हनन, गळचेपी करणारे आहेत. त्यामुळे ते रद्द करावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

जाणून घ्या काय आहेत नवे आयटी नियम?

1) केंद्र सरकारकडून 21 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पाठवले जाणारे किंवा शेअर केले जाणारे मेसेजच्या ओरिजनल सोर्सला ट्रॅक करणे गरजेचे आहे.

2) जर कोणतीही चुकीची किंवा फेक पोस्ट व्हायरल झाली तर सरकार संबंधीत कंपनीकडे त्या मूळ मेसेजकर्त्याची माहिती विचारु शकते. तसेच सरकारच्या मागणीनंतर सोशल मीडिया कंपन्यांना अशी माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

3) तक्रार अपडेट करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देखील निश्चित केला आहे.
तसेच कंपन्यांना संपूर्ण सिस्टिमवर नजर ठेवण्यासाठी स्टाफ नियुक्त करण्यास सांगितले आहे.

4) सोशल मीडिया कंपन्यांना कोणत्याही पोस्टसाठी तक्रारी आल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागेल. यासाठी कंपन्यांना 3 अधिकाऱ्यांना नियुक्त करावं लागेल.
यात चीफ कम्पायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडंट ग्रेवान्स ऑफिसर यांचा समावेश असेल.

Web Titel :- Digital News Portals | delhi high court refuses to stay new it rules for digital news portals today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक