Digital Payment | WhatsApp च्या ‘विजया’ मुळं आता PhonePe, Google Pay ला मोठी टक्कर ! 4 कोटी युजर्सची लिमिट वाढणार, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  डिजिटल पेमेंट (Digital Payment) व्यवसायात स्पर्धा आता आणखी वाढली आहे, कारण एनपीसीआयने (NCPI) व्हॉट्सअप (WhatsApp) च्या पेमेंट सर्व्हिस अंतर्गत यूजर्सचे लिमिट वाढवण्यासाठी परवानगी दिली आहे. व्हॉट्सअपवर अजूनपर्यंत दोन कोटी यूजरी मर्यादा लावण्यात आली होती, जी आता 4 कोटी करता येऊ शकते. (Digital Payment)

 

व्हॉट्सअपने काही काळापूर्वी आपल्या पेमेंट सर्व्हिसमध्ये यूजर्सची मर्यादा वाढवण्यासाठी NCPI कडे अर्ज केला होता, जो आतापर्यंत पुनरावलोकनाखाली होता.

 

मनीकंट्रोलच्या एका वृत्तानुसार, व्हॉट्सअप या महिन्याच्या सुरुवातीत आपल्या डिजिटल पेमेंट यूजर्सचे लिमिट वाढवण्याचा प्रयत्न करत होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देशातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमचे संचालन करते.

 

सर्व्हिस 2 कोटी लोकांपर्यंतच होती मर्यादित

 

NPCI मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअपला पेमेंट सर्व्हिस सुरूकरण्याची मंजूरी दिली होती. परंतु सोबतच त्यावर 2 कोटी यूजरचे लिमिटसुद्धा लावले होते. म्हणजे व्हॉट्सअप आपली पेमेंट सर्व्हिस केवळ 2 कोटी लोकांनाच देऊ शकत होते. (Digital Payment)

 

WhatsApp आल्याने विशेष फरक पडला नाही

 

या गोष्टीची अपेक्षा होती की Meta च्या मालकी हक्काच्या व्हॉट्सअपला पेमेंट सर्व्हिसची मंजूरी मिळाल्यानंतर डिजिटल पेमेंट स्पेसमध्ये मोठी उलथा-पालथ होईल. कारण संपूर्ण देशात व्हॉट्सअपकडे एक मोठा यूजर बेस आहे.

 

परंतु हा अंदाज खरा ठरला नाही आणि व्हॉट्सअपची पेमंट सर्व्हिस आल्याने कोणतीही उलथा-पालथ झाली नाही.

 

पेमेंट सर्व्हिसचा विस्तर करण्याचा निर्णय

 

अता व्हॉट्सअपने आपल्या पेमेंट सर्व्हिसच्या विस्तरावर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशाच प्रकारे ते आपला यूजर ग्रुप वाढवणार आहे. WhatsApp Pay च्या लिमिटमध्ये वाढीला मंजूरी मिळाल्याने देशात गुगल पे (GooglePay),
फोन पे (PhonePay),पेटीएम (PayTM) आणि जियो पे (JioPay) ला आणखी टक्कर मिळेल.
याचे कारण हे आहे की, पेमेंटसाठी लोकांना वेगळे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार नाही.

 

व्हॉट्सअपचा मोठा यूजर बेस

 

व्हॉट्सअप मेसंजर सर्व्हिसेसचे संपूर्ण भारतात 40 कोटी यूजर आहेत. व्हॉट्सअप एकदाच व्हॉट्सअप पेमेंट सर्व्हिसचे यूजर लिमिट हटवल्यानंतर
NPCI च्या सिस्टमवर अचानक मोठा भार येऊ शकतो. हे लक्षात घेऊन NPCI हळु-हळु व्हॉट्सअपच्या पेमेंट सर्व्हिसचे यूजर लिमिट टप्प्याटप्प्याने वाढवण्याच्या धोरणावर काम करत आहे.
मात्र व्हॉट्सअप आणि NPCI कडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

Web Title : Digital Payment | whatsapp wins approval to double payments offering to 40 million users in india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nora Fatehi | नोराचं नृत्य पाहून टेरेंन्स लुईस झाला फिदा, गीता मॉं म्हणाली – ‘अरे तोंड तरी बंद कर काका’

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा; ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचं ‘Whatsapp chat’ आलं समोर

Kirit Somaiya | आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले…