Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

Digital Rape in Noida | digital rape 17 year old minor girl 81 year painter noida police
File photo

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Digital Rape in Noida | नोएडा पोलिसांनी (Noida Police) 17 वर्षीय मुलीसोबत ’डिजिटल रेप’ (Digital Rape) केल्याच्या आरोपाखाली एका 81 वर्षीय चित्रकाराला अटक केली आहे. चित्रकार मॉरिस रायडर मूळचा प्रयागराजचा असून अनेक वर्षांपासून नोएडामध्ये राहतो. मॉरिसवर पीडितेसोबत अश्लील कृत्य (Obscene Act) केल्याचाही आरोप आहे. मॉरिस हा आधी हिंदू होता आणि नंतर त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला (Digital Rape in Noida).

मुलीसोबत राहणार्‍या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, 81 वर्षीय व्यक्तीने डिजिटल पद्धतीने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग (Molestation Case) केला आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी स्वत:ला मुलीचा संरक्षक असल्याचे सांगत होता आणि अनेकदा मुलीला अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape Case) आणि विनयभंग करत होता. (Digital Rape in Noida)

7 वर्षांपूर्वी आणले घरी :

पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, ती 10 वर्षांची असताना मॉरिसने तिला आपल्या घरी आणले होते. मॉरिसने तिच्या वडिलांना सांगितले की तो तिला शिकवेल. मात्र तिला येथे आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Crime Against Woman) करण्यास सुरुवात केली. याला विरोध केल्याने तिला मारहाणही करण्यात आली. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्या प्रायव्हेट पार्टला (Private Part) स्पर्श करत असे.

22 वर्षांपूर्वी आला होता नोएडामध्ये :

वास्तविक, मॉरिस हा आधी हिंदू होता आणि नंतर त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आपले करियर चांगले बनवण्यासाठी मॉरिस 22 वर्षांपूर्वी पत्नीसह प्रयागराजहून नोएडाला शिफ्ट झाला. पोलिसांचे म्हणणे आहे की, नोएडामध्ये आल्यानंतर मॉरिसची 2000 मध्ये एका फोटो प्रदर्शनादरम्यान दिल्लीतील एका महिलेशी भेट झाली. यानंतर ही महिला मॉरिससोबत राहू लागली.

पत्नी सोडून गेली :

घरात दुसरी स्त्री आल्यानंतर मॉरिसची पत्नी रागावली आणि कुटुंबासह प्रयागराजला परतली. मॉरिसकडे राहायला आलेली महिला डेहराडूनची होती. ज्या अल्पवयीन मुलीसोबत डिजिटल बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे, ती शिमला येथील मॉरिसच्या वर्कशॉपमध्ये काम करणार्‍या व्यक्तीची मुलगी आहे.

डिजिटल बलात्कार म्हणजे काय? (What is Digital Rape)

पोलिसांनी सांगितले की, डिजिटल बलात्काराचा अर्थ असा नाही की, मुलगा किंवा मुलीचे शोषण इंटरनेटच्या माध्यमातून केले जाते. हा शब्द दोन शब्द डिजिट आणि बलात्कार यांच्यापासून बनला आहे. इंग्रजीत डिजिटचा अर्थ जसा संख्या आहे, तसाच इंग्रजी शब्दकोशानुसार, बोट, अंगठा, पायाचे बोट, या शरीराच्या अवयवांना देखील ’डिजिट’ने संबोधित केले जाते. याच डिजिटचा वापर डिजिटल रेपमध्ये लैंगिक संबंधासाठी केला जातो.

लैंगिक छळ जो डिजिट माध्यमातून केला जातो त्यास ’डिजिटल रेप’ म्हणतात.
वास्तविक, डिजिटल बलात्काराच्या घटनांमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बोटांचा वापर केला जातो.
निर्भया प्रकरणानंतर (Nirbhaya Case) महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांना
आळा घालण्यासाठी डिजिटल रेपमध्येही अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title : Digital Rape in Noida | digital rape 17 year old minor girl 81 year painter noida police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी

Total
0
Shares
Related Posts
Khadki Pune Crime News | Beat the driver and took the cab away! Two rickshaws, a car and a pedestrian were hit on the way

Pune Crime News | पुणे : धर्मांतराचा कट? ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी आणि डान्स करुन बरे होत असल्याचे सांगणाऱ्या पास्टर व सिस्टरवर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल