पुढील वर्षी लाँच होईल भारताचा Digital Rupee, ट्रेडिशनल करन्सीपेक्षा वेगळे नसेल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Digital Rupee | भारताचे स्वत:चे अधिकृत डिजिटल चलन (Digital Currency) 2023 च्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे. हे सध्या खासगी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक वॉलेट (Electronic Wallets) सारखे असेल. पण त्यासोबत सरकारी हमीही असेल. एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने ही माहिती दिली. (Digital Rupee)

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात म्हटले होते की केंद्रीय बँक लवकरच डिजिटल रुपया (Digital Rupee) लाँच करेल.

 

एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आरबीआयने जारी केलेल्या डिजिटल चलनात (digital currency) भारतीय चलनाप्रमाणेच विशेष नंबर असतील. ते फियाट (fiat) चलनापेक्षा वेगळे असणार नाही. हे त्याचे डिजिटल स्वरूप असेल. फियाट करन्सी सरकारने जारी केल्या जाणार्‍या चलनाला म्हटले जाते.  त्यामुळे, असे म्हणू शकतो की डिजिटल रुपया हे सरकारी हमी असलेले डिजिटल वॉलेट असेल.

 

डिजिटल चलनाच्या स्वरूपात जारी केलेल्या युनिट्सचा समावेश चलनात असलेल्या चलनात केला जाईल.
ते फियाट चलनापेक्षा फारसे वेगळे असणार नाही. हे चलनाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप असेल.
याचा अर्थ ते सरकारद्वारे अनिवार्य इलेक्ट्रॉनिक वॉलेट असेल.
सूत्रांनी सांगितले की, RBI ने संकेत दिले आहे की, पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिजिटल रुपया तयार होईल.

 

रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या डिजिटल रुपीने ब्लॉकचेन (Blockchain), सर्व प्रकारचे व्यवहार करता येतील.
खासगी कंपन्यांच्या मोबाइल वॉलेटमध्ये ही यंत्रणा नाही.
सूत्राने पुढे सांगितले की, लोक सध्या खाजगी कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटचा वापर करून खाजगी कंपन्यांना पैसे हस्तांतरित करतात.
हा पैसा त्यांच्याकडेच राहतो आणि या कंपन्या ग्राहकांच्या वतीने व्यापारी, दुकानदार इत्यादींना पेमेंट करतात.

फोनमध्ये ठेवू शकता डिजिटल करन्सी
डिजिटल चलनाच्या बाबतीत, लोकांच्या फोनमध्ये डिजिटल चलन असेल आणि ते मध्यवर्ती बँकेकडे जमा असेल.
ते मध्यवर्ती बँकेकडून कोणत्याही दुकानदाराकडे हस्तांतरित केले जाईल.
यावर शासनाची संपूर्ण हमी असेल.

जेव्हा एखाद्या कंपनीच्या ई-वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित केले जातात तेव्हा त्या कंपनीची क्रेडिट रिस्क (Credit Risk) देखील या पैशाशी संलग्न केली जाते.
याशिवाय या कंपन्या शुल्कही आकारतात. सूत्राने पुढे सांगितले की, हे वॉलेज घेऊन जाण्याऐवजी फोनमध्ये पैसे असतील.

 

डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळेल चालना
2022 – 23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते की, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (Central Bank Digital Currency -CBDC) सुरू केल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की, डिजिटल चलन अधिक कार्यक्षम आणि स्वस्त करन्सी (more efficient and cheaper currency) मॅनेजमेंट सिस्टमला देखील प्रोत्साहन देईल.
म्हणून 2022-23 पासून आरबीआयद्वारे जारी केल्या जाणार्‍या ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रुपया सादर करण्याचा प्रस्ताव आहे.
या सेंट्रल बँक डिजीटल करन्सी (CBDC) चे नियंत्रण करणारे नेमक्या नियमांना अद्याप अंतिम रूप दिलेले नाही.

 

Web Title :- Digital Rupee | digital rupee indias digital rupee will be launched next year will not be different from traditional currency

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा