Digital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय? ती कशी जनरेट केली जातेय?, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  प्रथम डिजिटल काय आहे हे सहसा माहित नव्हते. तसा युग नव्हता. सध्या जग हे डिजिटल युगात आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सहसा डिजिटल मार्फत केल्या जातात. अधिकृत काम देखील याद्वारेच केले जाते. डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर देखील ऑफिस, कार्यालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. Documentation, presentation, data storage यासंदर्भातील कार्य देखील डिजीटलच्या माध्यमातून केले जाते. मुख्यतः म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी सिग्नेचर अथवा स्वाक्षरीही (सही) (Digital signature) डिजिटल स्वरूपात आली आहे. डिजिटल सिग्नेचर अथवा स्वाक्षरीही (सही) (Digital signature) कशी केली जाते याची प्रोसेस जाणून घ्या.

डिजीटल सही काय आहे?

एखाद्या व्यक्तीच्या हस्तलिखित स्वाक्षरीच इलेक्ट्रॉनिक रुप अर्थात डिजीटल सिग्नेचर (Digital signature) म्हणजेच सही आहे. कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी या स्वाक्षरीचा वापर केला जाऊ शकतो. ही डिजीटल प्रमाणपत्र प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक (Controller of Certifying Authority) मार्फत प्रमाणित प्राधिकरण मंजूर जारी करते. हे डिजीटल प्रमाणपत्र USB टोकन स्वरुपात असते. तसेच एक अथवा दोन वर्षासाठी वैधता असते. मुदत संपल्यानंतर प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागते.

Digital सहीची नोंदणी कशी करावी?

डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (Digital signature certificate) हे आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावीं लागते. व्यक्तीची ओळख पटण्यासाठी अशी प्रोसेस आवश्यक असते.

या डिजीटल स्वाक्षरी नोंदणी प्रोसेस –

> www.incomtaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी PAN अथवा password वापरुन Log In करणे.

> Log In केल्यानंतर मुख्य मेनूमधून प्रोफाईल सेटिंग्जवर जाऊन, नोंदणी डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्रावर क्लिक करणे.

> लॅडींग पेजवर दिल्या गेलेल्या लिंक वरुन DSC Management Utility Download करणे, तसेच, Zip Folder मधून बाहेर काढून DSC Management Utility ओपन करणे.

> DSC Management Utility मध्ये डिजीटल सहीचा वापर करत दुसरा टॅब Register / reset password मध्ये जावं लागेल.

> Computer / Laptop च्या USB पोर्टमध्ये DSC USB टोकन लावा.

> ई-फायलिंगमध्ये नोंदणी केलेला User ID आणि PAN नंबर टाका.

> डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्राची निवड करा आणि स्वाक्षरी फाईल जनरेट करणे.

> पुन्हा E-Filing Portal वर जाणे, नोंदणी डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्राच्या पेजवर जनरेट केलेली स्वाक्षरी फाईल जोडणे. तसेच सबमिट करणे.

> DSC चे नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेल तुमच्या नोंदणीकृत Email ID वर पाठवला जाईल.

नोंदणी झाल्यानंतर आगामी टप्पा हा ITR पडताळणीसाठी असतो. त्याची प्रक्रिया बघा..

>  नवीन DCS मॅनेजमेंट Utility डाऊनलोड करा E-Filing Portal मधून. झिप फोल्डरमधून बाहेर काढत Utility ओपन करा.

> तिसरा टॅब XML सिलेक्ट करा. त्यानंतर एक्सेल किंवा जावा Return filing utility मधून जनरेट केलेली XML फाईल ब्राऊज करा. जर रिटर्न ऑनलाईन ई-फायलिंग अकाऊंटमधून तयार केलं जात असेल, तर चौथा टॅब सबमिट ITR / Form ऑनलाईनचा वापर करा.

> DCS चा (USB token) प्रकार निवडा आणि स्वाक्षरी फाईल जनरेट करा.

> परत जा E-Filing वेबसाईटवर . ITR XML फाईल अपलोड करताना डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्राच्या रेडीओ बटणची निवड करा.

> E-Filing वेळी XML फाईल सोबत सिग्नेचर अपलोड करा.

डिजीटल स्वाक्षरीचे तीन प्रकार –

> ही व्यक्तिगत उपयोगासाठी जारी केली जाते. कमी किंमतीच्या व्यवहारासाठी याचा वापर केला जातो. यासाठी ओळखीचा पुरावा लागत नाही.

> ही डिजीटल स्वाक्षरी (Digital signature) विविध सरकारी संस्थांमध्ये कागदपत्र दाखल करण्यासाठी वापरली जाते. Income Tax Department, कॉर्पोरेट संबंधित मंत्रालये आदी. आयकर परतावा याच स्वाक्षरीचा वापर केला जातो.

> याचा वापर Railways, banks, रस्ते परिवाहन प्राधिकरण, वीज कार्यालयासारख्या सरकारी विभागांमध्ये E-tendering च्या दरम्यान केला जातो.

आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती

Web Title : Digital Signatur | what is digital signature how it works and how it will be made know details