मतदार दिनानिमित्त उद्या लाँच होईल ‘डिजिटल मतदार कार्ड’, Aadhaar प्रमाणेच करता येईल Download

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 25 जानेवारी रोजी देशात मतदार दिन (Voters Day) साजरा केला जाईल. त्याबाबत तयारी जोरात सुरू आहे. यावेळी निवडणूक आयोग मतदारांना मोठी भेट देण्यासही तयार आहे. वास्तविक, 15 जानेवारी रोजी देशात डिजिटल मतदार कार्ड (Digital Voter card) सुरू होईल. हे आधार प्रमाणेच मतदार डाऊनलोड करू शकतील. निवडणूक आयोगामार्फत सोमवारी इलेक्ट्रॉनिक इलेक्‍टर्स फोटो आयडेंटिटी अ‍ॅप (ई-इपिक) लाँच होणार आहे.

माहिती प्रसारित करण्यात आली आहे की ई-इपिकच्या वापरासाठी विशेष प्रक्रिया आणि काही नियम पाळावे लागतील. डिजिटल मतदार कार्डसाठी मतदाराला त्याच्या संपूर्ण माहितीची पडताळणी करावी लागते. मतदारांच्या मोबाईल क्रमांकासह त्यांचा ईमेल आयडी देखील अनिवार्य असेल.

प्रक्रियेअंतर्गत, मतदाराचा मोबाईल क्रमांक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये नोंदविताच अ‍ॅपद्वारे त्याला मेल व संदेश फोनवर प्राप्त होईल. यामध्ये सुरक्षा लक्षात घेऊन पासवर्ड म्हणून ओटीपी प्रदान केला जाईल. यात दोन क्यूआर कोड देखील असतील. यामध्ये मतदारांची संपूर्ण माहिती आणि त्या क्षेत्राविषयी पूर्ण माहिती समाविष्ट असेल.

निवडणूक आयोग मतदार ओळखपत्राच्या हार्ड कॉपीचा पर्यायही सुरू ठेवेल आणि यासाठी 25 रुपये शुल्क आकारले जाईल. डिजिटल व्यवस्थेमुळे कार्ड गमावणे आणि नवीन कार्ड मिळवण्याच्या त्रासातून मुक्तता मिळेल, त्याचबरोबर आयोगालाही कार्डच्या वितरणापासून दिलासा मिळणार आहे.