लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या नेतृत्वाच्या वक्तव्यावरून दिग्विजय सिंह-ओवैसी ‘संतप्त’, दोघांनीही दिला ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या नेतृत्वाच्या विधानावर आक्षेप व्यक्त केला आहे. रावत यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, जमावाला दंगलीसाठी प्रवृत्त करणे हे नेतृत्व नाही.

या दोन्ही नेत्यांनी या निवेदनासाठी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांना सल्ला दिला आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, ‘जनरल साहब यांच्या शब्दांशी मी सहमत आहे. परंतु नेते असे नाहीत जे त्यांच्या अनुयायांना जातीय हिंसाचाराच्या नरसंहारामध्ये सामील होऊ देतात. जनरल साहेब तुम्ही माझ्याशी सहमत आहात का?

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की,’नेतृत्वाचा अर्थ अससी पण आहे कि लोकांनी त्यांच्या कार्यालयाच्या मर्यादेचे उल्लंघन न करणे. हे नागरीक वर्चस्वाच्या विचारांना समजणे आणि आपण नेतृत्व करीत असलेल्या संस्थेची अखंडता जपण्याबद्दल विचार करेल.

बिपीन रावत म्हणाले, ‘नेते लोकांना चुकीच्या दिशेने नेत असतात. आम्ही पाहत आहोत की, महाविद्यालये आणि विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या निदर्शनात सहभागी होत आहेत. ते सर्व हिंसाचार करीत आहेत. तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान करीत आहेत. हे नेतृत्व नाही.

digy-1.jpg

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/