भगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस नेत्याचे संतापजनक वक्तव्य (व्हिडीओ)

भोपाळ : वृत्तसंस्था – आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची पुन्हा जीभ घसरली आहे. भोपाळ येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे संतापजनक वक्तव्य केले आहे. आज, भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जात आहेत, मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत. हा आपला धर्म आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू समाजात त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

सरकारवर टीका करत असताना ते हिंदू धर्मावर घसरले. भगवे वस्त्र नेसून लोक चूर्ण विकताहेत. देवळांमध्ये बलात्कार होत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ज्यांनी सनातन धर्माची बदनामी केली आहे, त्यांना देव माफ देखील करणार नाही असे म्हणत आपल्या संतापजनक वक्तव्याची सारवासारव करण्याचा दिग्विजय सिंह यांनी प्रयत्न केला.

काहीजण आपला कुटुंबाला सोडून साधु बनत आहेत. धर्माचा अभ्यास करत असताना अध्यात्माची ओढ त्यांना लागते. मात्र, आज भगवे वस्त्र परिधान करून बलात्कार केले जात आहेत, त्यांनी चिन्मयानंद यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. चिन्मयानंद यांच्यावर मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना लवकरच अटक होऊ शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like