अजून वेळ गेलेली नाही : खा. गांधी 

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्यासाठी चांगला निर्णय होऊ शकतो. आपण थोडे थांबू, असे सांगत खा. दिलीप गांधी यांनी समर्थक कार्यकर्त्यांना शांत केले.
बैठकीत बोलताना कार्यकर्ते म्हणाले, ‘पक्षाशी एकनिष्ठ खा. गांधी यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे. तो निर्णय तातडीने बदलावा. कार्यकर्त्यांचे रक्तदाब वाढविणारा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यामुळे खा. दिलीप गांधी यांनी आता शांत बसू नये. तातडीने योग्य निर्णय घ्यावा. खा. गांधी यांना डावलून सुजय विखे यांना तिकिट देण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला आहे. भारतीय जनता पार्टीमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा निर्णय अजिबात मान्य नाही.’
सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपच्या गांधी समर्थक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. पक्षाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व गांधी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.१३) दुपारी बैठक घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गांधी यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्याशी चर्चा केली.
अर्बन बँकेचे संचालक अजय बोरा म्हणाले की, राजकीय वलय असलेल्या विखेंसाठी निष्ठावानांवर पक्षाने अन्याय केला आहे. खा. दिलीप गांधी यांनी पक्ष सोडला तर जिल्ह्यातून पक्ष शून्यावर येईल, एवढी ताकत त्यांची आहे. राजकीय लाभासाठी सुजय विखे भाजपात आले आहे. त्यांची बांधिलकी फक्त सत्ता पैशाशी आहे.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

खा. गांधी समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोरच घोषणाबाजी सुरू केली. गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.

ह्याही बातम्या वाचा –

गरज पडल्यास नारायण राणे शरद पवारांचे पाय धरतील : विनायक राऊत 

Video : मोदींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

बायोपिकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

फायद्यासाठी विखे कुठेही जातील : बाळासाहेब थोरात

राजू शेट्टी ‘बॅट’ घेऊन लोकसभेच्या मैदानात