50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ’50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलवून लावत पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार, असा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 24 परगना जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना घोष बोलत होते. ते म्हणाले कि, सर्वात आधी मतदारयादीतून त्यांचं नाव काढून टाकण्यात येणार आहे. तसेच गरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देऊ. असे केल्यांनतर ममतादीदींना मतांचं ध्रुवीकरण करता येणार नाही. ज्यामुळे त्यांची मतं आपोआपच कमी होतील आणि येत्या निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकू, असा विश्वास घोष यांनी व्यक्त करत ममतादीदींच्या पक्षाला 50 जागासुद्धा जिंकता येणार नसल्याचे घोष यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, दिलीप घोष यांनी 12 जानेवारीलादेखील अश्याच पद्धतीचं वादग्रस्त विधान केलं होतं. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांना भाजपाशासित राज्य उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात गोळ्या घातल्या पाहिजेत. राज्यात एक कोटी घुसखोर असून त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जे हिंसक प्रदर्शन केलं, यात 500 ते 600 कोटी रुपयांचं सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं आहे. ती काय त्यांच्या वडिलांची संपत्ती आहे काय ?, ते सरकारच्या संपत्तीला कशा प्रकारे नुकसान पोहोचवू शकतात. जी करदात्यांच्या पैशातून तयार झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

तसेच, उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक सरकारनं अशा राष्ट्रविरोधी तत्त्वांवर गोळीबाराची कारवाई करून योग्य काम केलं आहे. आमचंच खातात, इथेच राहतात आणि इथल्याच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतात. अश्या पद्धतीचं वादग्रस्त विधान गोष्ट यांनी केलं. मात्र गोष्ट त्यांच्या या विधानाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांचे विचार आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी दिलं.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like